ग्लेनमार्कवरील निर्बंधाने ‘एमएसडी’चे पेटंट सुरक्षित
By Admin | Updated: October 23, 2015 01:45 IST2015-10-23T01:45:45+5:302015-10-23T01:45:45+5:30
मधुमेहावरील ज्या दोन औषधांचे पेटंट ‘मर्क शार्प अॅण्ड डोम इंडिया’(एमएसडी) या कंपनीकडे आहे, त्या औषधांचे उत्पादन, तसेच विक्री व त्या औषधीद्रव्याचा कोणत्याही

ग्लेनमार्कवरील निर्बंधाने ‘एमएसडी’चे पेटंट सुरक्षित
नवी दिल्ली : मधुमेहावरील ज्या दोन औषधांचे पेटंट ‘मर्क शार्प अॅण्ड डोम इंडिया’(एमएसडी) या कंपनीकडे आहे, त्या औषधांचे उत्पादन, तसेच विक्री व त्या औषधीद्रव्याचा कोणत्याही प्रकारचा वापर व व्यापार ‘ग्लेनमार्क’ कंपनीला करता येणार नाही, असा निवाडा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
सिटाग्लिप्टिन क्षार हा गाभा असलेल्या जानुविया आणि जानुमेट या मधुमेहावरील औषधांचे पेटंट एमएसडी इंडियाकडे आहे. परिणामी, याच क्षारांच्या आधारे झिटा अणि झिटा-मेट या मधुमेहावरील औषधांचे ग्लेनमार्कने सुरू केलेले उत्पादन हे पेटंट हक्काचे उल्लंघन असल्याचा एमएसडीचा दावा आहे. हा तर्क उच्च न्यायालयाने ७ आॅक्टोबरला दिलेल्या निकालात मान्य केला आहे. म्हणूनच एमसीडीकडे पेटंट असलेल्या औषधाचा गाभा असलेल्या क्षाराचा कोणत्याही प्रकारे पूर्ण वा अंशत:सुद्धा वापर करण्यास न्यायालयाने ग्लेनमार्क कंपनीला मज्जाव केला आहे.