शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या, केंद्राची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:54 IST

कोरोना लसीचा देशात तुटवडा निर्माण झाला असून, १५ मे नंतर लसींचा सर्वांना पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली :  ज्यांना कोरोनाची दुसरी लस टोचून घ्यायची आहे, त्यांना प्राधान्याने लस द्या, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. केंंद्राकडून पुरविण्यात येणाऱ्या लसींपैकी ७० टक्के लसी दुसऱ्यांदा लस घेणाऱ्यांना व ३० टक्के लसी पहिल्यांदा लस घेणाऱ्यांना दिल्या जाव्यात, असेही केंद्राने म्हटले आहे. (Give preference to second vaccinators, Centre's instructions to states)

कोरोना लसीचा देशात तुटवडा निर्माण झाला असून, १५ मे नंतर लसींचा सर्वांना पुरेसा पुरवठा करण्यात येईल, असे उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर  लसीकरणास अद्याप संपूर्ण क्षमतेने सुरुवात झालेली नाही. केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या व दिलेल्या मुदतीत लसीकरण पूर्ण करावे.

साखळी तोडण्यासाठी भारतात काही आठवड्यांचे लॉकडाऊन हवे - डॉ. अँथोनी फौसीभारतात दररोज चार लाखांहून अधिक कोरोनाचे दैनंदिन रुग्ण आढळत आहेत. देशावरील कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भारतात काही आठवड्यांचा लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनातील प्रमुख वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फौसी यांनी दिला आहे. एका मुलाखतीत डॉ. फौसी यांनी भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कोरोनाचा विषाणू ‘हिट अँड रन’प्रमाणे वागत आहे. 

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक-    भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. त्याबद्दल निश्चित अंदाज लावता येणार नाही. सध्याची दुसरी लाट कशा पद्धतीने हाताळतो, त्यावरही बरेच काही अवलंबून आहे. मात्र, व्यापक लसीकरण झाल्यास तिसरी लाट टाळता येणे शक्य आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार