याकुबला आजीवन कारावास द्या, काँग्रेस आमदारांची मागणी
By Admin | Updated: July 29, 2015 00:42 IST2015-07-29T00:42:32+5:302015-07-29T00:42:32+5:30
मुंबई- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याची फाशी मानवतेच्या दृष्टीकोनातून रद्द करून त्याला आजीवन कारावासाची शिक्षा देण्याची मागणी काँग्रेसच्या आठ मुस्लीम आमदारांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे केली आहे. यापूर्वी समाजातील मान्यवरांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देण्याकरिता हे पत्र लिहिल्याचे या आमदारांनी सांगितले.

याकुबला आजीवन कारावास द्या, काँग्रेस आमदारांची मागणी
म ंबई- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमन याची फाशी मानवतेच्या दृष्टीकोनातून रद्द करून त्याला आजीवन कारावासाची शिक्षा देण्याची मागणी काँग्रेसच्या आठ मुस्लीम आमदारांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याकडे केली आहे. यापूर्वी समाजातील मान्यवरांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देण्याकरिता हे पत्र लिहिल्याचे या आमदारांनी सांगितले.माजी मंत्री नसीम खान, अस्मल शेख, मुजफ्फर हुसैन, हुस्नबानो खलिफे, अमिन पटेल आदी आमदारांच्या या पत्रावर स्वाक्षर्या आहेत. याबाबत नसीम खान यांना विचारले असता ते म्हणाले की, याकुब मेमनची फाशी मानवतेच्या दृष्टीकोनातून रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र आठ निवृत्त न्यायमूर्ती तसेच विधिज्ञ राम जेठमलानी, मार्कंडेय काटजू, सीताराम येचुरी, नसीरुद्दीन शाह, महेश भ आदी २०० हून अधिक मान्यवरांनी राष्ट्रपतींना यापूर्वी लिहिले आहे. त्या मागणीला पाठिंबा देणारे हे पत्र आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करावा व नवीन कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करावा, हीच मागणी पत्रात केली आहे. (विशेष प्रतिनिधी)