शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या नेत्यांना जरा चांगले सल्ले द्या, राहुल गांधींची मोदी भक्तांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 17:40 IST

नवी दिल्ली- काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींच्या आडून त्यांच्या भक्तांवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींच्या आडून त्यांच्या भक्तांवर निशाणा साधला आहे. भक्तांनो तुमच्या नेत्यांना जरा चांगले सल्ले द्या आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी लक्ष्य द्यायला सांगा, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. केवळ पोकळ घोषणा देण्यापेक्षा आवश्यक बाबींवर लक्ष द्यायला सांगा, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.राहुल गांधी यांनी रविवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये चीन कशा प्रकारे रोजगार उपलब्ध करतो आहे, हे दाखवण्यात आलं आहे. चीन भारतासमोर रोजगाराचं आव्हान उभं करत असताना तुमचे नेते पोकळ घोषणाच देतायत. त्यामुळे कृपा करून हा व्हिडीओ पाहा, जेणेकरून तुम्ही नरेंद्र मोदींना रोजगार उपलब्ध होण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर लक्ष्य देण्याचा सल्ला देऊ शकाल, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी भक्तांना धारेवर धरले आहे. व्हिडीओमध्ये चीनमधील सिलिकॉन व्हॅलीची बाजारपेठ दाखवण्यात आली आहे. तेथे नव्या उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी कशा प्रकारे मदत केली जाते. त्याप्रमाणेच छोट्यात छोट्या तंत्रज्ञानाची कशी दखल घेतली जाते, याची माहिती देण्यात आली आहे. चीनच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असल्याचंही या व्हिडीओतून दाखवण्यात आलं आहे.चीन रोजगार निर्मितीसाठी करत असलेल्या उपाययोजनांचा दाखला देत मोदींना लक्ष्य केलं आहे.  त्या प्रमाणेच स्मार्ट सिटीवरूनही राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींनी मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील बारकावे दाखवून दिले आहेत. स्मार्ट सिटीसाठी 9,860 कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यातील केवळ 7 टक्केच निधी म्हणजे फक्त 645 कोटी रुपये वापरले गेल्याचं राहुल गांधींनी अधोरेखित केलं आहे. हे ट्विट करताना राहुल यांनी #BJPEmptyPromises असा टॅग वापरून मोदी सरकारला टार्गेट केलंय.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन