सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 06:06 AM2021-05-13T06:06:06+5:302021-05-13T06:10:06+5:30

नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवना‌वश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.

Give Free vaccines to all, stop 'Central Vista', letter of 12 Opposition parties to PM | सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र

सर्वांना मोफत लस द्या, ‘सेंट्रल विस्टा’ थांबवा, १२ विरोधी पक्षांचे पंतप्रधानांना पत्र

Next

शीलेश शर्मा -
 
नवी दिल्ली : कोरोनावरील लस देशात तयार केलेली असो किंवा परदेशातून आयात केलेली, देशातील प्रत्येक नागरिकाला ती मोफत दिली जावी आणि राजधानीत सुरू असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेससह विरोधी पक्षांतील १२ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.  देशातील नागरिकांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारे प्रयत्न करावेत, असे यात म्हटले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. या निधीचा वापर मोफत लस देण्यात केला जावा, असे यात सुचविले आहे. (Give Free vaccines to all, stop 'Central Vista', letter of 12 Opposition parties to PM)

नवे संसद भवन तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान यांचा समावेश असलेल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवून यासाठी निर्धारित केलेल्या निधीतून ऑक्सिजन आणि लस यांसारख्या जीवना‌वश्यक बाबींची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर पक्षांचे नेते ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन, फारुख अब्दुल्ला, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, डी. राजा आणि सीताराम येच्युरी यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिले आहे. 

यात अशी मागणी केली आहे की, पीएम केअर या नावाखाली स्थापन केलेल्या खासगी ट्रस्टमध्ये बेकायदा जो पैसा गोळा करण्यात आला आहे, त्यातून कोरोना काळात रोजगार गमावलेल्यांना प्रति महिना सहा हजार रुपये दिले जावेत, तसेच गरजवंतांना रेशन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. या नेत्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, या मागण्यांची पूर्तता केली जावी आणि देशहितासाठी या पत्राचे उत्तर सार्वजनिक केले जावे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Give Free vaccines to all, stop 'Central Vista', letter of 12 Opposition parties to PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app