शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

“३ वर्षांत रेल्वेला किती निधी दिला, आकडे द्या”; प्रवासी सुरक्षेवरून SCने केंद्राला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:52 IST

Supreme Court Indian Railway Passenger Security: या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित दोन प्रमुख बाबींवर भर दिला आहे.

Supreme Court Indian Railway Passenger Security: रेल्वे प्रशासनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून असे दिसते की, अर्थसंकल्पातील सर्वांत मोठा वाटा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, संयुक्त उपक्रम आणि विशेष उद्देशासाठी स्थापन संस्थांसाठी तरतूद केला गेला आहे. प्राथमिक मतानुसार ही बाब योग्य नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच केंद्र सरकारला खडेबोल सुनावले.

सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी रेल्वेला अधिक भरीव निधी देण्याची अपेक्षा व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने, संबंधित यंत्रणांनी अधिक व्यवहार्य दृष्टिकोन ठेवावा आणि अर्थसंकल्पातील मोठा हिस्सा थेट रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या सुधारण्यासाठी खर्च करावा. त्यातही प्रवाशांची सुरक्षितता आणि संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. या बाबतीत रेल्वेने समतोल भूमिका घेणे आवश्यक आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले. 

सामान्य माणसाच्या सुरक्षिततेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही

रेल्वेवर विश्वास ठेवून प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाच्या सुरक्षिततेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नाही. रेल्वे ही इतरत्र गुंतवणूक करण्यासाठीची संस्था नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. रेल्वे अपघात भरपाईसंबंधी एका प्रकरणात न्यायालयीन मित्र म्हणून यात सहभागी असलेले ज्येष्ठ अधिवक्ता शिखिल सूरी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांनंतर न्यायालयाने स्वतःहून रेल्वे सुरक्षेचा प्रश्न हाती घेतला. तिकीट विमा सुविधा केवळ ऑनलाइन तिकीट घेणाऱ्या प्रवाशांपुरती मर्यादित असून, तिकीट खिडकीवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ती लागू नसल्याचा मुद्दाही पुढे आला.

गेल्या ३ वर्षांत रेल्वेला किती निधी दिला, आकडे द्या

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून याबाबत स्वतंत्र प्रतिज्ञापत्र मागवले आहे. यामध्ये रेल्वे मंत्रालयाला मागील तीन वर्षांत करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूद, रेल्वे मंत्रालयाने विविध शीर्षकांखाली केलेले अंतर्गत निधी वाटप, प्रत्येक शीर्षकाखाली प्रत्यक्ष झालेला खर्च, तसेच आर्थिक वर्ष २०२५–२६ साठी (उपलब्धतेनुसार) ताजी आकडेवारी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रेल्वे सुरक्षेसंबंधी कामे पूर्ण करण्याचा कालावधी २०४२–४३ पर्यंत दर्शवला असताना, प्रस्तावित अर्थसंकल्पी तरतुदी त्या कालमर्यादेशी सुसंगत आहेत की नाही, याबाबतही स्पष्टीकरण देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय रेल्वे सुरक्षिततेशी संबंधित दोन प्रमुख बाबींवर विचार करत आहे. पहिला मुद्दा मानवरहित रेल्वे क्रॉसिंगची व्यवस्था, तसेच रेल्वे उड्डाणपूल (ओव्हरब्रिज) व अंडरब्रिजची उभारणी, आणि दुसरा मुद्दा मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे रुळांवर बसवली जाणारी ‘कवच’ ही स्वयंचलित सुरक्षा प्रणालीचा आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : SC Scolds Centre Over Railway Funds, Passenger Safety Concerns Raised

Web Summary : The Supreme Court has criticized the central government over railway funding, prioritizing passenger safety. The court demanded details of funds allocated in the last three years and questioned the timeline for safety upgrades, emphasizing passenger safety above all else.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndian Railwayभारतीय रेल्वे