भाजपच्या हाती सत्ता द्या, तुम्हाला प्रशस्त रस्ते देईन

By Admin | Updated: April 8, 2016 02:30 IST2016-04-08T02:30:38+5:302016-04-08T02:30:38+5:30

‘काँग्रेस राजवटीत आसाममधे गेल्या ६0 वर्षांत जे घडले नाही ते भाजपचे सरकार पुढल्या पाच वर्षांत घडवून दाखवेल. भाजपच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या

Give BJP power in the hands of the BJP, you will give excellent roads | भाजपच्या हाती सत्ता द्या, तुम्हाला प्रशस्त रस्ते देईन

भाजपच्या हाती सत्ता द्या, तुम्हाला प्रशस्त रस्ते देईन

सुरेश भटेवरा,  गुवाहाटी
‘काँग्रेस राजवटीत आसाममधे गेल्या ६0 वर्षांत जे घडले नाही ते भाजपचे सरकार पुढल्या पाच वर्षांत घडवून दाखवेल. भाजपच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या, तुम्हाला आसामचे भाग्य बदलणारे काँक्रीटचे प्रशस्त रस्ते मी देईन. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात लवकरच जलवाहतूक सुरू करेन. तरुणांसाठी राज्यात असंख्य नवे रोजगार सुरू होतील. केवळ निवडणुकीपुरती ही आश्वासने नाहीत तर केंद्र सरकारने आसाममधे हजारो कोटींच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभही केला आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय भूतल परिवहन व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी आसाममधील जाहीर सभांमध्ये केले.
आसामच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी बरखेत्री (नलबारी), गोलपारा पूर्व आणि ढुबरी जिल्ह्यांतील बिलासीपारा मतदारसंघात उपस्थितांचे उजळलेले चेहरे गडकरींच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद देत होते. वेगाने काम करणारा मंत्री अशी प्रतिमा देशभर प्रस्थापित झाल्याने त्यांच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रचंड उत्सुकतेने मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
प्रत्येक सभेत, शाळा, सरकारी दवाखाने आणि सार्वजनिक सेवांची दैन्यावस्था इत्यादी विषयांवरून गडकरींनी काँग्रेस राजवटीवर नर्मविनोदी शैलीत जोरदार प्रहार केले.

Web Title: Give BJP power in the hands of the BJP, you will give excellent roads