शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या', भाजप खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:57 IST

'नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार.'

Bharatratna :बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू पक्षाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) आणि ओरिसाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी पक्षाचे प्रमुख नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी होत आहे. ही मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बेगुसराय मतदारसंघाचे खासदार गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी केली आहे. 

नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणारभाजप खासदार गिरिराज सिंह म्हणाले की, 2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल. कोणीही संभ्रमात राहू नये. लालू प्रसाद यादव सर्वतोपरी प्रयत्न करतील, पण बिहार विधानसभेच्या निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील आणि बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणारयापूर्वी पक्ष जनता दल (युनायटेड) ने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. जेडीयूचे खासदार राजीव रंजन सिंह उर्फ ​​लालन सिंह आणि पक्षाचे कार्याध्यक्ष संजय झा यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष एनडीएच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तसाच राहील. दरम्यान, भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीदेखील म्हटले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षी बिहार विधानसभा निवडणूक लढवेल. 2025 च्या अखेरीस बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे.

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारOdishaओदिशाBharat Ratnaभारतरत्नBJPभाजपा