शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 14:59 IST

पुलवामातील हल्ल्याचा उद्धव ठाकरेंकडून तीव्र शब्दांमध्ये निषेध

मुंबई: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. पाकिस्तानला सोडणार नाही, असं नुसतंच बोलू नका. प्रत्यक्ष कारवाई करा. 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. दहशतवादी हल्ल्याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपुराध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर काल हल्ला झाला. यामध्ये 37 जवान शहीद झाले. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली. आता हल्लेखोरांना सोडणार नाही, असं नुसतंच बोलू नका. निवडणुकांचा प्रचार जाऊ द्या, पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा, अशी मागणी उद्धव यांनी केली. 2016 मध्ये भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले होते. याचा संदर्भ देत उद्धव यांनी त्यापेक्षाही कठोर कारवाईची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आला होता. तो भारताचाच भाग आहे. मात्र आता त्यापेक्षा पुढे जाण्याची गरज असल्याचं उद्धव म्हणाले. सध्या सरकारकडून देशातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र पूर्ण देश शांतच आहे. शांत राहण्याशिवाय देशातील जनता काय करु शकते. पण तुम्ही का शांत आहात?, असा सवाल उद्धव यांनी सरकारला विचारला. पाकिस्तानात घुसा आणि मोठी कारवाई करा. संपूर्ण देश सरकारच्या मागे आहे. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवायची हीच वेळ आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं. काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक