नवी दिल्ली : देशातील स्त्रियांमध्ये होणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हिकल कॅन्सर) रोखण्यासाठी केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. लवकरच देशभरातील १४ वर्ष वयोगटातील मुलींसाठी 'ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (एचपीव्ही) लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
मुलींना 'गार्डासिल' ही लस एकाच डोसच्या स्वरूपात देण्यात येईल. ही मोहीम विशेष अभियानाच्या स्वरूपात राबवली जाणार असून एकच प्रभावी डोस असलेले लसीकरण पूर्णपणे मोफत आणि ऐच्छिक असेल.
का आहे ही लस गरजेची?
भारतात महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी देशात ८०,००० नवीन रुग्ण आढळतात आणि ४२,००० हून अधिक मृत्यू होतात. योग्य वेळी लसीकरण केल्यास हा आजार मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो.
१४व्या वर्षीच का?
१४ वर्षांचे वय हे लसीकरणासाठी सर्वाधिक योग्य मानले जाते. संभाव्य संसर्ग होण्यापूर्वीच लस दिल्यास प्रतिबंधात्मक फायदा जास्त मिळतो.
काय आहे ही मोहीम ?
सध्या खुल्या बाजारामध्ये या लसीच्या एका डोसची किंमत सुमारे ३,९२७ रुपये आहे, मात्र सरकारी मोहिमेमुळे सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील मुलींना ही लस मोफत उपलब्ध होणार आहे.
लसीचे महत्त्व आणि सुरक्षा
कर्करोगापासून संरक्षण : ही लस एच प्रकार १६ व १८ पासून संरक्षण देते, जे भारतात ८० टक्क्यांहून अधिक गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रकरणांसाठी कारणीभूत आहेत.
प्रभावी आणि सुरक्षित : २००६ पासून जागतिक स्तरावर ५० कोटींहून अधिक डोस दिले गेले असून ही लस ९३ ते १०० टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
भारताची स्थिती : जगात १६० देशांनी आधीच ही लस आपल्या वेळापत्रकात समाविष्ट केली आहे, भारत आता या यादीत सामील होईल.
Web Summary : The central government will launch a vaccination drive for girls aged 14 to prevent cervical cancer. The HPV vaccine ('Gardasil') will be given as a single dose, free and voluntary. Cervical cancer is the second most common cancer among women in India, and this initiative aims to significantly reduce its prevalence.
Web Summary : केंद्र सरकार 14 साल की लड़कियों के लिए सर्वाइकल कैंसर की रोकथाम के लिए टीकाकरण अभियान शुरू करेगी। एचपीवी वैक्सीन ('गार्डासिल') मुफ्त और स्वैच्छिक रूप से एक खुराक के रूप में दी जाएगी। भारत में महिलाओं में सर्वाइकल कैंसर दूसरा सबसे आम कैंसर है, और इस पहल का उद्देश्य इसकी व्यापकता को काफी कम करना है।