शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनर किलिंग; गळ्यावर वार करून मुलीच्या प्रियकराची तिच्या वडिलांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 09:32 IST

राजधानी दिल्लीमध्ये अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे.

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीमध्ये अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली आहे. एका तरूणीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराची गळ्यावर चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकित सक्सेना असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव असून तो फोटोग्राफर होता.  मुलीच्या वडिलांनी अंकितला अडवून भरचौकात त्याची हत्या केली. 

याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, काका व आईला अटक केली आहे.  23 वर्षीय अंकितचे 20 वर्षीय तरूणीशी प्रेमसंबंध होते. पण ती तरूण दुसऱ्या समाजाची होती. मी अंकितची टागोर गार्डन मेट्रो स्टेशनवर वाट पाहत होती. तो त्याची बाईक आणायला घरी गेला होते. तेथे असताना अंकितची हत्या माझ्या वडील व काकांनी केल्याचं मला समजलं, असं तरूणीने पोलिसांना सांगितलं आहे. 

गुरूवारी संध्याकाळी पश्चिम दिल्लीच्या रघुवीर नगरमध्ये ही घटना घडली. अंकितच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी कामावरून परतत असताना मुलीच्या घरून फोन आला त्यावेळी ते अंकितच्या स्टुडिओमध्ये जात होते. काहीवेळाने शेजारचा मुलगा घरी आला व त्याने अंकितला चौकात काही लोक मारत असल्याचं सांगितलं. अंकितची आई तेथे पोहचल्यावर अंकितला मुलीचे वडील व काका लाथांनी मारत असल्याचं पाहिलं. मारहाणीत जखमी झालेला अंकित जमिनीवर पडला होता. 

अंकितला फोटोग्राफ्रीची आवड होती. तो लग्न-समारंभात फोटोग्राफी करत करायचा. मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या आई-वडिलांनाही मारहाण केली आहे. मारहाणीत मुलाची आई गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अंकितला मारहाण होत असताना तो मुलीच्या वडिलांना व काकाला हात जोडून पोलीस स्टेशनमध्ये चलण्याची विनंती करत होता. हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलूया असं त्याचं म्हणणं होतं. पण मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच काहीही ऐकून न घेता त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. अंकितची नियोजन करूनच हत्या झाली, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. अंकितची हत्या करायची हे त्यांनी आधीच ठरवलं होतं, म्हणून ते चाकू बरोबर घेऊन आले होते. व अंकितला धक्के देत रस्त्याच्याकडेला जेथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणी नेलं व त्याची हत्या केली, असा आरोप अंकितच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनNew Delhiनवी दिल्ली