शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनाही देता येईल एनडीए प्रवेश परीक्षा, सर्वोच्च न्यायालय; आजवर संधी नाकारल्याने लष्कराला फटकारले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 05:39 IST

NDA entrance exam : मुलींना एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यासाठी संधी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका कुश कार्ला यांनी कोर्टात केली होती.

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीए) प्रवेश परीक्षा आता मुलींनाही देता येईल. तसा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला. या परीक्षेसाठी आजवर मुलींना संधी नाकारल्याबद्दल कोर्टाने लष्कराला फटकारले आहे.मुलींना एनडीएची प्रवेश परीक्षा देण्यासाठी संधी मिळावी, अशी विनंती करणारी याचिका कुश कार्ला यांनी कोर्टात केली होती. पात्रता असलेल्या मुलींना संधी नाकारून एनडीए राज्यघटनेच्या १४, १५, १६ व १९व्या कलमांचे उल्लंघन करीत आहे, असा आरोप याचिकेत केला होता. ही प्रवेश परीक्षा यंदा १४ नोव्हेंबरला होणार आहे.या याचिकेत म्हटले आहे की, एनडीएची प्रवेश परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या मुलींना संधीच मिळत नाही. याबाबत संरक्षण दलांनी लिंगभेदभावाचे धोरण अवलंबिले आहे. राज्यघटनेच्या १४व्या कलमाद्वारे प्रत्येक नागरिकाला समानतेचा हक्क दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीसाठी सर्वांना समान संधी देण्याची हमी १६व्या कलमाद्वारे देण्यात आली आहे. आपल्याला हवा तो व्यवसाय, नोकरी करण्याचे स्वातंत्र्य १९व्या कलमाद्वारे नागरिकांना प्रदान करण्यात आले असून, कोणताही भेदभाव होणार नाही, असे १५व्या कलमात म्हटले आहे.  सर्वोच्च न्यायालयात याचिकादाराची बाजू वकील चिन्मय प्रदीप शर्मा यांनी मांडली. या याचिकेच्या सुनावणीप्रसंगी केंद्राने सांगितले की, लष्करात महिलांसाठी उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांमध्ये पुरुष उमेदवारांप्रमाणेच महिलांनाही समान संधी देण्यात येत आहे. महिला व पुरुषांनी लष्करी सेवेत दाखल होण्याच्या सध्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही.

आरआयएसीमध्येही मुलींना प्रवेश द्याडेहराडूनच्या राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयात (आरआयएसी)मध्ये या शैक्षणिक वर्षापासून मुलींना प्रवेश देण्यात यावा, अशी एक स्वतंत्र याचिका कैलास मोरे यांनी दाखल केली आहे. कुश कार्ला यांच्या याचिकेप्रमाणेच मोरे यांच्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालय लवकरच निकाल देण्याची शक्यता आहे. संरक्षण दलांच्या आरआयएसी महाविद्यालयात फक्त मुलांनाच प्रवेश दिला जातो.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnda puneएनडीए पुणे