मुलीचा जळालेला मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:03 IST2020-01-08T06:03:17+5:302020-01-08T06:03:21+5:30
जिल्ह्यातील कुमारगंज भागात सोमवारी रस्त्याखालच्या नालीत १७ वर्षांच्या मुलीचा जळालेला मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

मुलीचा जळालेला मृतदेह आढळला
बालूरघाट (पश्चिम बंगाल) : दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील कुमारगंज भागात सोमवारी रस्त्याखालच्या नालीत १७ वर्षांच्या मुलीचा जळालेला मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकले गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
मृतदेहावर जखमा झालेल्या दिसत होत्या. या घटनेत गुंतले असल्याच्या संशयावरून तीन जणांना अटक झाल्याचे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक देबर्षी दत्ता यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे आम्ही सांगू शकू, असे त्या म्हणाल्या.
रविवारी दुपारी ती जवळच्या दुकानाकडे जात असताना बेपत्ता झाली, असे तिच्या भावाने सांगितले. गुन्हेगार पकडले गेले नाहीत तर मोठे आंदोलन करण्याची धमकी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक खासदार सुकांता मजुमदार यांनी दिली.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे कुमारगंजचे आमदार तोराफ हुस्सेन यांनी सांगून तटस्थ चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.
डिसेंबर २०१९ मध्ये मालदा जिल्ह्यात आंब्याच्या बागेत महिलेचा जळालेला मृतदेह सापडला होता. हैदराबादजवळ महिलेचा जळालेला मृतदेह सापडल्यानंतर काहीच दिवसांनी या महिलेचा मृतदेह सापडला होता.
हैदराबादेत महिलेच्या जळालेल्या मृतदेहानंतर देशभर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यान, या घटनेमुळे लोकांमधून संतापाची लाट उसळली आहे. (वृत्तसंस्था)