मैत्रिणीचं चुंबन महिलेला पडलं महागात
By Admin | Updated: September 20, 2016 12:21 IST2016-09-20T10:31:40+5:302016-09-20T12:21:08+5:30
गाडी चालवतानाही काहीजणांना आपल्या लैंगिक भावना आवरता येत नाहीत. शेजारी बसलेल्या प्रियकर-प्रेयसीचे चुंबन घेण्याचा मोह आवरत नाही अशावेळी मग एखादा अपघात होऊन बसतो.

मैत्रिणीचं चुंबन महिलेला पडलं महागात
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २०- गाडी चालवतानाही काहीजणांना आपल्या लैंगिक भावना आवरता येत नाहीत. शेजारी बसलेल्या प्रियकर-प्रेयसीचे चुंबन घेण्याचा मोह आवरत नाही अशावेळी मग एखादा अपघात होऊन बसतो. रविवारी रात्री बंगळुरु शहरात असाच एका अपघात घडला. होंडा सिटी कार चालवणा-या महिलेने ओला टॅक्सी आणि एका दुचाकीस्वाराला धडक दिली.
टॅक्सीचालक आणि दुचाकीस्वार दोघांनी अपघात घडला त्यावेळी कार चालक महिला शेजारी बसलेल्या महिलेचे चुंबन घेत होती असा दावा केला आहे. कार चालक महिलेने चुंबनाचा आरोप फेटाळला आहे. शेजारी बसलेल्या महिलेच्या डोळयात कचरा गेल्याने तिच्या डोळयाची जळजळ होत होती. म्हणून मी डोळयांवर फुंकर घालत होती असे आरोपी महिलेने म्हटले आहे.
आरोपी महिला ३० वर्षांची असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. तिच्या विरोधात बेदरकारपणे गाडी चालवण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघाताच्यावेळी ती मद्याच्या नशेत नव्हती हे ही चाचणीतून स्पष्ट झाले आहे.
ओलाचा टॅक्सी चालक शेखर रामचंद्र (३५) याच्या गाडीला होंडा सिटीने मागून धडक दिली. फरहान अहमद यांच्या स्कूटरचेही या महिलेने नुकसान केले. अपघातानंतर या महिलेने गाडी बाहेर पडून माफी मागण्याचीही तसदी घेतली नाही. ती शेजारी बसलेल्या महिलेचे चुंबन घेत होती असा आरोप दोघांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.