शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसह स्वतःच्याच मुलाचं अपहरण, अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 17:50 IST

या अभिनेत्याचं मुस्कान नावाच्या एका महिलेसोबत लग्न झालं होतं. मुलाच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी एका प्रेमीयुगुलाला अटक केली आहे.

नवी दिल्ली, दि. 13 - दिल्लीच्या जामिया नगर येथील बाटला हाऊस परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकल्याचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका प्रेमीयुगुलाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा भोजपुरी चित्रपटांचा अभिनेता आहे. त्याने स्वतःच्याच मुलाचं अपहरण केलं होतं. दिल्ली पोलिसांनी चिमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बिहारच्या मुजफ्फरपूर येथील रहिवासी असून मोहम्मद शाहिद (23) असं त्याचं नाव आहे. त्याचं मुस्कान नावाच्या एका महिलेसोबत लग्न झालं होतं. मात्र, काही वर्षांमध्येच दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. दोघांना दोन वर्षांचा एक मुलगा आहे. यानंतर शाहीद एका अन्य तरूणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. मुस्कानपासून वेगळं झाल्यामुळे मुस्कान शाहिदला आणि मुलाला भेटू देत नव्ह्ती. मुलाला भेटता येत नाही याचा राग शाहिदच्या मनात होता. त्यामुळे आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत त्याने मुलाचं अपहरण करण्याचा कट रचला. त्याने मुस्कानला मुलाला घेऊन बाटला हाऊस येथे बोलावले. तेथे आल्यावर त्याने मुलाला आपल्या लिव्ह इन पार्टनरच्या हातात दिले आणि मुलाला घेऊन त्या तरूणीने तेथून पळ काढला. 

 घडलेल्या प्रकारामुळे मुस्कान गोंधळली. तिने मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार जामिआ नगर पोलीस स्थानकात केली. मुलाची माहिती देणा-यास 20 हजार रूपयांची घोषणा करण्यात आली होती. अखेर पोलिसांना या प्रकऱणाचा छडा लावण्यात यश आलं आहे. त्यांनी या प्रेमीयुगुलाला अटक केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण