छेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळ्या घालून हत्या
By Admin | Updated: February 23, 2016 13:28 IST2016-02-23T13:28:49+5:302016-02-23T13:28:49+5:30
छेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील सितापूर येथील ही घटना आहे

छेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळ्या घालून हत्या
>ऑनलाइन लोकमत -
उत्तरप्रदेश दि, 23 - छेडछाडीला विरोध करणा-या तरुणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सितापूर येथील ही घटना आहे. कामावरुन घरी जात असताना दोघांनी गोळ्या झाडून तरुणीची हत्या केली आहे.
पिडीत तरुणी मोलकरणीचं काम करते. आपल्या बहिणीसोबत घरी जात असताना रस्त्याच्या कडेला उभे असणा-या दोघांनी त्यांची छेड काढण्यास सुरुवात केली. पिडीत तरुणीने त्यांचा विरोध केला असता आरोपींनी तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि दुचाकीवरुन पळून गेले. पिडीत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिची बहिण जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याअगोदरही अशाप्रकारे आमची छेड काढण्यात आली होती तेव्हा आम्ही तक्रार केली होती मात्र तेव्हा पोलिसांनी दुर्लक्ष केला असल्याचा आरोप पिडीत तरुणीच्या बहिणीने केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाची चौकशी करत आहेत.