किस ऑफ लव्ह मोहीम सुरु करणा-या दाम्पत्याला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक
By Admin | Updated: November 18, 2015 13:57 IST2015-11-18T13:57:24+5:302015-11-18T13:57:24+5:30
केरळमधील किस ऑफ लव्ह मोहीमेचे प्रणेते राहुल पशूपलन आणि त्यांची पत्नी रश्मी एन नायर यांना केरळ पोलिसांनी सेक्स रॅकेटप्रकरणात अटक केली आहे.

किस ऑफ लव्ह मोहीम सुरु करणा-या दाम्पत्याला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक
ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. १८ - केरळमधील किस ऑफ लव्ह मोहीमेचे प्रणेते राहुल पशूपलन आणि त्यांची पत्नी रश्मी एन नायर यांना केरळ पोलिसांनी सेक्स रॅकेटप्रकरणात अटक केली आहे. राज्यातील ऑनलाइन सेक्स रॅकेटमध्ये या दाम्पत्याचा सहभाग होता असा पोलिसांचा आरोप आहे.
काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये कथित संस्कृती रक्षकांनी एका रेस्टॉरंटमध्ये तोडफोड केली होती. या रेस्टॉरंटमध्ये प्रेमी युगूल अश्लील कृत्य करत असल्याचा संस्कृती रक्षकांचा आरोप होता. संस्कृती रक्षकांच्या या गुंडगिरीविरोधात केरळी तरुणाईने जोरदार विरोध दर्शवला होता. यानंतर केरळमध्ये राहुल, त्याची पत्नी रश्मी व अन्य काही मंडळींनी किस ऑफ लव्ह ही मोहीमच सुरु केली होती. यामध्ये तरुण - तरुणी सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करायचे. ही मोहीम अल्पावधीत चांगलीच गाजली व देशभरातील मेट्रो शहरांमध्येही ही मोहीम राबवण्यात आली होती. बुधवारी केरळ पोलिसांनी राहुल व त्याच्या पत्नीसह आठ जणांना अटक केली आहे. या घटनेने केरळमध्ये खळबळ माजली आहे.