सेल्फी घेताना मुलगी बुडाली

By Admin | Updated: January 15, 2017 01:02 IST2017-01-15T01:02:16+5:302017-01-15T01:02:16+5:30

अलकनंदेच्या काठावर सेल्फी घेत असताना एक मुलगी नदीच्या पाण्यात वाहून गेली. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात शुक्रवारी हा दुर्देवी प्रकार घडला.

The girl was sunk while taking selfies | सेल्फी घेताना मुलगी बुडाली

सेल्फी घेताना मुलगी बुडाली

डेहरादून : अलकनंदेच्या काठावर सेल्फी घेत असताना एक मुलगी नदीच्या पाण्यात वाहून गेली. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात शुक्रवारी हा दुर्देवी प्रकार घडला. सेल्फी घेताना ही मुलगी काठावरून घसरून नदीत कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. अश्ना भंडारी असे या मुलीचे नाव आहे. केंद्रीय विद्यालयातील १२ वीची विद्यार्थीनी असलेली अश्ना मित्रमैत्रिणींसह कोटेश्वर मंदिरात दर्शनासाठी आली होती. दर्शनानंतर हे विद्यार्थी नदीकाठची गुहा पाहण्यासाठी गेले तेव्हा ही दुर्घटना घडली.

Web Title: The girl was sunk while taking selfies