हिंदू मुलीसोबत फिरणा-या तरुणाला भररस्त्यात विवस्त्र करुन मारहाण

By Admin | Updated: August 25, 2015 12:01 IST2015-08-25T11:56:16+5:302015-08-25T12:01:22+5:30

हिंदू मुलीसोबत गाडीतून फिरतो म्हणून कर्नाटकमधील मंगळुरु येथे अल्पसंख्यांक समाजातील तरुणाला हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

The girl was stabbed and beaten up with a Hindu girl | हिंदू मुलीसोबत फिरणा-या तरुणाला भररस्त्यात विवस्त्र करुन मारहाण

हिंदू मुलीसोबत फिरणा-या तरुणाला भररस्त्यात विवस्त्र करुन मारहाण

ऑनलाइन लोकमत 

मंगळुरु, दि. २५ - हिंदू मुलीसोबत गाडीतून फिरतो म्हणून कर्नाटकमधील मंगळुरू येथे अल्पसंख्यांक समाजातील तरुणाला हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या गुंडांनी त्या तरुणाला भरबाजारपेठेत विवस्त्र करुन एका खांबाला बांधून ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर या तरुणाच्या बचावासाठी पुढे आलेल्या मुलीलाही या गुंडांनी मारहाण केल्याचे समजते. 
मंगळुरुमधील स्टोअरमध्ये मॅनेजर म्हणून काम करणा-या तरुणाला त्याच्या ऑफीसमधील तरुणीने दोन हजार रुपये मागितले होते. पैसे काढण्यासाठी संबंधीत तरुण व तरुणी एटीएम सेंटरमध्ये जाण्यासाठी निघाले. या दरम्यान बजरंग दलाचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले व त्यांनी त्या तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तरुणीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता या कार्यकर्त्यांनी तिलाही मारहाण केली. मारहाण करुनही समाधान न झाल्यावर या कथीत संस्कृतीरक्षकांनी संबंधीत तरुणाला विवस्त्र करुन त्याला एका खांब्याला बांधून ठेवले. हा सर्व प्रकार एका स्थानिक वाहिनीने दाखवायला सुरुवात केल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तरुणाची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले असून अन्य संशयीतांचा सोध सुरु आहे. मात्र या मॉरल पोलिसिंगविरोधात मँगलोरमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

Web Title: The girl was stabbed and beaten up with a Hindu girl