रेल्वेच्या खिडकीतून पडून बालिका ठार
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:45+5:302015-08-08T00:23:45+5:30
मिरज : धावत्या रेल्वेच्या खिडकीतून डोकावत असताना अल्फीया फिरोज शेख या १० वर्षीय बालिकेचा गाडीतून पडल्याने मृत्यू झाला. हुबळी-कुर्ला चालुक्य एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली.

रेल्वेच्या खिडकीतून पडून बालिका ठार
म रज : धावत्या रेल्वेच्या खिडकीतून डोकावत असताना अल्फीया फिरोज शेख या १० वर्षीय बालिकेचा गाडीतून पडल्याने मृत्यू झाला. हुबळी-कुर्ला चालुक्य एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली.अल्फीया ही आईसोबत पुण्याला जात होती. आरक्षित बोगीतून प्रवास करताना अपघातप्रसंगी बाहेर पडण्यासाठी असलेल्या खिडकीतून डोकावून ती बाहेर पहात होती. उगार स्थानकाजवळ तोल जाऊन अल्फीया धावत्या एक्स्प्रेसमधून खाली पडली. तिच्या आईने आरडाओरडा केल्याने प्रवाशांनी साखळी खेचून एक्स्प्रेस थांबवली. डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या अल्फीयाला मिरजेत उपचारास आणेपर्यंत तिचा मृत्यू झाला. (वार्ताहर)