त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणीला अटक
By Admin | Updated: April 3, 2017 16:33 IST2017-04-03T14:07:09+5:302017-04-03T16:33:59+5:30
17 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 21 वर्षाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. केरळ येथील कोट्टायम जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणीला अटक
ऑनलाइन लोकमत
कोट्टायम(केरळ), दि. 2 - 17 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 21 वर्षाच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे. केरळ येथील कोट्टायम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. अटक करण्यात आलेली तरुणी आणि अल्पवयीन मुलगा एकाच घरात प्रियकर-प्रेयसी म्हणून राहत होते.
या तरुणीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटकही केले आहे. 17 वर्षीय मुलाच्या आईने संबंधित तरुणीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर रामापूरम पोलिसांनी धडक कारवाई करत तरुणीला ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर सुरुवातीला तरुणीनं आत्मसमर्पण करण्यास नकार देत घराचे दार लावून घेतले. त्यामुळे पोलिसांना घराचे दार तोडून तिला ताब्यात घ्यावं लागलं.
दरम्यान, न्यायालयात तरुणीला हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाल्याची माहिती अल्पवयीन मुलाने कोर्टात दिली.