शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मल्याळम अभिनेत्रीसोबत रेल्वे प्रवासादरम्यान छेडछाड, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 14:20 IST

रेल्वेतून प्रवास करताना एका मल्याळम अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. मावेली एक्सप्रेममधून प्रवास करताना ही घटना घडली. यावेळी तिच्या मदतीला कोणीही आले नाही. मात्र, छेडछाड करणा-या आरोपीला या अभिनेत्रीने टीटीई येईपर्यंत पकडून ठेवले होते. 

नवी दिल्ल्ली : रेल्वेतून प्रवास करताना एका मल्याळम अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आली आहे. मावेली एक्सप्रेममधून प्रवास करताना ही घटना घडली. यावेळी तिच्या मदतीला कोणीही आले नाही. मात्र, छेडछाड करणा-या आरोपीला या अभिनेत्रीने टीटीई येईपर्यंत पकडून ठेवले होते. सानुशा संतोष असे या मल्याळम अभिनेत्रीचे नाव आहे. 23 वर्षीय सानुशा संतोष मावेली एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. यावेळी ती एक्सप्रेसमधील वरच्या बर्थवर झोपली असताना एका व्यक्तीने तिच्याशी छेडछाड केली. यादरम्यान तिने मदतीसाठी इतर प्रवाशांना आवाज दिला. मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबद्दल तिने एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार ती म्हणाली की, एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान झोपले असताना माझ्या ओठांवर काहीतरी असल्याचे जाणवले. यावेळी मला जाग आली असता एका व्यक्ती हात माझ्या ओठांवर असल्याने मला भीती वाटली. मात्र, त्या व्यक्तीचा मी हात पकडला आणि मदतीसाठी बाजूच्या प्रवाशांकडे मदतीसाठी आवाज दिला. यावेळी बाजूच्या प्रवाशांनी माझी मदत केली नाही. त्यानंतर काही वेळानंतर फक्त स्क्रिप्ट रायटर आणि एक जण प्रवासी माझ्या मदतीला आले. ही घटना साधारणत: रात्री एक वाजताच्या सुमारास घडली, असे सानुशा संतोषने सांगितले.   छेडछाड करणा-या व्यक्तीला सानुशा संतोषने टीटीई येईपर्यंत पकडून ठेवले होते. त्यानंतर टीटीई आल्यानंतर त्यांनी पुढच्या स्टेशनला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि पोलिसांना कळविले. दरम्यान, याप्रकरणी सानुशा संतोष हिने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या 'दंगल' सिनेमात कुस्तीपटू गीता फोगाटच्या बालपणीची भूमिका करणारी काश्मीरी अभिनेत्री झायरा वसीमशी विमानामध्ये असभ्य वर्तन केल्याची माहिती समोर आली होती. झायरा वसीमनं आपल्या इनस्टाग्रामच्या पोस्टवरुन ही माहिती दिली होती. झायरा नवी दिल्ली ते मुंबई असा विस्तारा एअरलाइनन्सने प्रवास करत असताना तिच्यासोबत एका सहप्रवाशानं असभ्य वर्तन केले होते. विमानात आपल्या जागेवर झायरा झोपलेली असताना अगदी तिच्या मागच्या सीटवर बसलेल्या एक पुरुष प्रवासी तिच्या सीटवर मानेजवळ आपला पाय टाकून झोपला होता. तसेच तो झायराला पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्नही करीत होता. या प्रकारामुळे झायरा घाबरुन गेली होती. हा प्रकार घडत असताना झायराने विमानाच्या क्रू मेंबर्सना याबाबत माहिती दिली. मात्र, त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. तिच्या मदतीला कोणीही धाऊन आले नाही, असा आरोपही तीने केला आहे. या घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्नही तीने केला. मात्र, विमानातील अंधूक प्रकाशामुळे तिला ते शक्य झाले नाही. दरम्यान, याप्रकरणी असभ्य वर्तन करणा-या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली होती.  

 

टॅग्स :Crimeगुन्हाRailway Passengerरेल्वे प्रवासी