तरुणीचे अपहरण करून बळजबरीने केले लग्न

By Admin | Updated: December 21, 2016 23:08 IST2016-12-21T23:08:17+5:302016-12-21T23:08:17+5:30

26 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नव्या नगर येथील विजय कुशवाह

The girl was abducted and forced to marry | तरुणीचे अपहरण करून बळजबरीने केले लग्न

तरुणीचे अपहरण करून बळजबरीने केले लग्न

ऑनलाइन लोकमत

इंदूर, दि. 21 -  26 वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. नव्या नगर येथील विजय कुशवाह याच्याशी काही महिन्यापूर्वी या तरुणीचे लग्न ठरले होते. मात्र विजयच्या घराच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी करण्यात आल्याने हे लग्न मोडण्यात आले होते. त्यामुळे विजयने त्या तरुणीचे गेल्या सप्टेंबर महिन्यात अपहरण केले. त्यानंतर तिला धमकी देत तिच्याशी एका आर्य समाज मंदिरात लग्न केले.
मी त्याला चुकवून माझ्या घरच्यांना फोन केला आणि मदत करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी खजांरा पोलिसांच्या मदतीने सुटका केली. मात्र त्यावेळी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे तरुणीने म्हटले आहे. 

घरी परतल्यानंतर तरुणीला पुन्हा विजयकडून धमक्या येत असल्याने तिने थेट डीआयजी ऑफिसकडे धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी विजयवर गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: The girl was abducted and forced to marry