शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केला विद्यार्थिनीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 04:53 IST

बिहारमच्या छप्रा जिल्ह्यातील सारण येथील खासगी शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर डिसेंबरपासून बलात्कार होत होते

पाटणा - बिहारमच्या छप्रा जिल्ह्यातील सारण येथील खासगी शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर डिसेंबरपासून बलात्कार होत होते आणि त्यात शाळेतील ११ विद्यार्थ्यांबरोबरच दोन शिक्षक व मुख्याध्यापकही सहभागी होते, असे उघडकीस आले असून, त्यामुळे खळबळ माजली आहे.या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक उदय मुकुंद व शिक्षक बालाजी यांना अटक करण्यात आली असून, अन्य एक शिक्षक, तसेच ११ विद्यार्थी यांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. गेले सात महिने हा प्रकार सुरू असल्याची तक्रार पीडित मुलीने केल्यानंतर लगेच पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर महिन्यात काही विद्यार्थ्यांनी तिला जबरदस्तीने नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यातील काहींनी त्याचे मोबाइलवर चित्रीकरणही केले. त्या चित्रीकरणाच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून ते विद्यार्थी तिच्यावर नंतरही बलात्कार करीत राहिले. मुलीने घाबरून त्याची माहिती घरच्यांनाही दिली नाही.हे प्रकार वारंवार होऊ लागल्याने विद्यार्थिनीने दोन शिक्षकांकडे विद्यार्थ्यांची तक्रार केली, पण त्या तक्रारीची दखल घेऊन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी दोन्ही शिक्षकांनीही तिच्यावर बलात्कार केले. त्यामुळे विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली, पण मुख्याध्यापकांनीही विद्यार्थी व शिक्षकांवर कारवाई केली नाही आणि त्यांनीच तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे अखेर मुलीने सारणच्या महिला पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिथे तक्रार केली.काही विद्यार्थी अल्पवयीन?त्या मुलीने मुख्याध्यापक, दोन्ही शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. आम्ही आतापर्यंत मुख्याध्यापक, एक शिक्षक यांच्यासह एकूण चार जणांना अटक केली आहे. त्या शाळेत जाऊ नही पाहणी केली असून, अन्य काही विद्यार्थी व शिक्षकांची चौकशी केली आहे. आम्ही अन्य १४ जणांचा शोध घेत आहोत, असे सारण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरकिशोर राय यांनी सांगितले. विद्यार्थ्यांपैकी काही जण अल्पवयीन असू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारBiharबिहारCrimeगुन्हा