शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 8 वर्षांची असताना आई-वडिलांनी मुलीला विकलं, 16 व्या वर्षी आहे 4 मुलांची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 09:45 IST

उत्तर प्रदेशातील संभळमध्ये घडलेली घटना काळजाला चटका लावणारी आहे.

बरेली- उन्नाव, कथुआ, सूरतनंतर आता उत्तर प्रदेशातील संभळमध्ये घडलेली घटना काळजाला चटका लावणारी आहे. तेथे 2010 साली एका आठ वर्षांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांनीच राजस्थानमधील एका माणसाला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आता 16 वर्षांची असून ती चार मुलांची आई आहे. याप्रकरणी पीडित मुलीने वडील, सावत्र आई व मावशीविरोधात तक्रार दाखल केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तिला 2010 साली भरतपूरमधील एका माणसाला विकलं. त्याचबरोबर पीडित मुलीच्या सहा व चार वर्षांच्या दोन लहान बहिणींनाही राजस्थानमधील माणकाकडे विकलं. 2010 साली पीडित मुलीला विकल्यावर तेथे तिच्यावर तब्बल आठ वर्ष सतत बलात्कार झाला. त्यामध्ये तिने चार मुलांना जन्म दिला आहे. तिच्यावर होणारे अत्याचार असह्य झाल्यावर पीडित मुलीने भरतपूरमधील तिच्या घरातून पळ काढच संभळमधील नातेवाईकांचं घर गाठलं. 

पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, आईचं निधन झाल्यानंतर 2010 साली तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. घरी आलेल्या सावत्र आईने मला सतत त्रास द्यायला सुरूवात केली. पीडित मुलीला तीन बहिणी व एक भाऊ आहे. सावत्र आईने मला व माझ्या दोन लहान बहिणींना तिच्या राजस्थानमधील बहिणीच्या घरी नेलं. त्यानंतर राजस्थानमधील एका 50 वर्षीय माणसाकडे मला 3 लाख रुपयांना विकलं. माझं त्याच्याशी लग्न लावून दिलं व माझं नाव बदललं. सहा वर्षात मी चार मुलांना जन्म दिला. पण त्यापैकी दोन मुलांचा त्यांच्या जन्माच्या एका महिन्यातच मृत्यू झाला, पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली आहे. 

पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आलं असून मुलीवर बलात्कार झाल्याने तिने मुलांना जन्म दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असं पोलीस अधिकारी सुदेश कुमार यांनी सांगितलं. 

दरम्यान, पोलिसांनी मुलीचे वडील, सावत्र आई, मावशी व तिला विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrimeगुन्हाRapeबलात्कार