लग्नास नकार दिला म्हणून मुलीने प्रियकरावर केला अॅसिड हल्ला
By Admin | Updated: January 12, 2016 13:56 IST2016-01-12T13:44:32+5:302016-01-12T13:56:32+5:30
लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्यामुळे मुलीने प्रियकराचा चेहरा अॅसिड फेकून भाजल्याचा उलटा प्रकार येथे घडला आहे.

लग्नास नकार दिला म्हणून मुलीने प्रियकरावर केला अॅसिड हल्ला
>ऑनलाइन लोकमत
बिजनोर, दि. १२ - लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्यामुळे मुलीने प्रियकराचा चेहरा अॅसिड फेकून भाजल्याचा उलटा प्रकार येथे घडला आहे. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस आणि आजुबाजुचे रहिवासी हैराण झाले आहेत.
त्या मुलीचं नाव आफरीन असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आफरीनने सुरज कुमारला वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले, ज्या आमंत्रणाचा त्याने लगेच स्वीकार केला.
वाढदिवसाची पार्टी झाल्यावर सूरज कुमार घरी जायला निघाला. आफरीनने त्याला फोन करून पुन्हा बोलावलं. तिथं गेल्यावर आफरीनने त्याच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला, परंतु ती मुस्लीम व मी हिंदू असल्याने तिला नकार दिल्याचे सूरजने पोलीसांना सांगितले. सूरज कुमारने आफरीनला आपलं लग्न ठरल्याचं सांगितलं. त्यामुळे भडकलेल्या आफरीननं चेह-यावर अॅसिड टाकल्याचं सूरज म्हणाला. त्याचा मित्र अर्जुन कुमारने सूरजला रुग्णालयात हलवले. सूरज सुमारच्या प्रकृतीला धोका नसला तरी चेहरा काही प्रमाणात विद्रुप झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आफरीन व सुरज कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते, आणि त्यांचे दीड वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळल्याचं समजतं. दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला, परंतु घरच्यांच्या विरोधामुळे सूरजने तिच्याशी संबंध तोडले.
हा प्रेमप्रकरणाचा प्रकार असून सूरजचे वडील महेंद्रसिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.