शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

चिमुकलीला मिळणार शेतकऱ्याचे हृदय, अपघातात ब्रेनडेड शेतकऱ्याचे अंगदान, दोन जणांना जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 07:11 IST

Organ Donation: मुंबईच्या एका रुग्णालयात मृत्यूशी लढणाऱ्या एका पाचवर्षीय चिमुकलीचे प्राण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे. या मुलीला एका ४१ वर्षीय शेतकऱ्याचे हृदय प्रत्याराेपित करण्यात येणार आहे.

इंदूर : मुंबईच्या एका रुग्णालयात मृत्यूशी लढणाऱ्या एका पाचवर्षीय चिमुकलीचे प्राण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे. या मुलीला एका ४१ वर्षीय शेतकऱ्याचे हृदय प्रत्याराेपित करण्यात येणार आहे. शेतकऱ्याचे मरणाेपरांत अंगदान करण्यात आले. त्यामुळे या मुलीसह आणखी चार जणांना नवजीवन मिळणार आहे.इंदूरच्या शासकीय महात्मा गांधी स्मृती चिकित्सा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजय दीक्षित यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ही एक दुर्लभ शस्त्रक्रिया असेल. मुंबईत उपचार घेत असलेल्या मुलीचे हृदय आणि आजूबाजूचे अवयवांची जागा असामान्य पद्धतीने माेठी झाली आहे, तर अंगदान करणाऱ्या शेतकऱ्याच्या हृदयाचा आकार लहान आहे. त्यामुळे वयस्क व्यक्तीचे हृदय प्रत्याराेपित करण्याची शक्यता बळावली.अपघातात जखमी झाले हाेते शेतकरीखुमसिंह साेळंकी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे हृदय मुंबईला हवाई मार्गाने पाठविण्यात आले. साेळंकी हे २८ नाेव्हेंबरला रस्ते अपघातात गंभीररीत्या जखमी झाले हाेते. त्यांना मंगळवारी ब्रेन डेड जाहीर करण्यात आले. आपले दु:ख सारून कुटुंबीय त्यांच्या अंगदानासाठी सहमत झाले. साेळंकी यांचे लिव्हर आणि दाेन किडनी इंदूर येथील तीन गरजू रुग्णांना देण्यात येत आहेत, तर फुप्फुसे हैदराबाद येथील एका रुग्णाला देण्यात येणार आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Organ donationअवयव दानMadhya Pradeshमध्य प्रदेशFarmerशेतकरी