शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अजब ! बॉयफ्रेंडने फोन नाही उचलला म्हणून तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 15:14 IST

बॉयफ्रेंडने फोनला उत्तर न दिल्याने नाराज झालेल्या तरुणीने बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची अजब घटना पुण्यात घडली आहे

पुणे - बॉयफ्रेंडने फोनला उत्तर न दिल्याने नाराज झालेल्या तरुणीने बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची अजब घटना पुण्यात घडली आहे. धक्कादायक म्हणजे तरुणीने तक्रार करताना आपला प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची खोटी तक्रार केली. 24 वर्षीय तरुणीने पोलिसांकडे लेखी तक्रार देतानाही हाच आरोप केला. पोलिसांनी तपास केला असता, सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी समज देऊन दोघांना सोडून दिलं आहे. 

गर्लफ्रेंडच्या सततच्या मेसेजेसमुळे वैतागला होता तरुणमिळालेल्या माहितीनुसार, आरोप करणारी तरुणी लातूर जिल्ह्याची रहिवासी आहे. पुण्यात राहणारा आपला प्रियकर फोन उचलत नसल्याने ती नाराज होती. बॉयफ्रेंडने सतत फोनकडे दुर्लक्ष करत असल्याचं लक्षात येताच तरुणीने 9 ऑक्टोबरला पोलीस ठाण्यात तक्रार केली की, बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांनी मिळून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. तरुणीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तरुणाची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं. चौकशी केली असता, दोघांनीही एकमेकांशी लग्न केलं असल्याची माहिती मिळाली. मात्र तरुणीच्या वारंवार फोन आणि मेसेज करण्याच्या सवयीला तरुण कंटाळला होता. यामुळे त्याने फोन आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. 

27 ऑक्टोबरला केलं होतं लग्नसत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी कोणताही एफआयआर दाखल न केल्याने वॉर्निंग देत दोघांना सोडून दिलं. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'माणुसकी म्हणून आम्ही कोणतीच कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरुणीने कायद्याचा चुकीचा वापर केल्याचंही निष्पन्न झालं आहे'. या प्रकरणात सामील जोडप्याने 27 ऑक्टोबरलाच लग्न केलं आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारPoliceपोलिस