शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चालताना तलावात घसरुन पडली मुलगी; वाचवायला गेलेल्या आई आणि भावासह पाच जणांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:25 IST

गुजरातमध्ये एका मुलीला वाचवताना कुटुंबातील इतर सदस्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Gujarat Accident:गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुडणाऱ्या एकाला वाचवण्याचा नादात कुटुंबातील अन्य सदस्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुजरातच्या पाटण येथील वडवली गावातील तलावात बुडून ५ जणांचा मृत्यू झाला. तलावाजवळून जात असताना एका कुटुंबातील मुलगी घसरली आणि बुडू लागली. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची आई आणि भावासह अन्य दोन जणही बुडाले. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे.

पाटण जिल्ह्यातील चाणस्मा तालुक्यातील वडवली गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. मृत्यू झालेले सर्वजण एकाच गावातील होते. त्यांच्या शेळ्या तलावाजवळ चरत असताना पाच जणांपैकी एका मुलीचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. बाकीच्यांनी तिला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली पण कोणीही बाहेर येऊ शकले नाही. सर्वांचाच बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून चार मुलांसह पाच जणांना तलावातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करुन सर्वांना मृत घोषित केलं.

गावातील एका कुटुंबातील काहीजण शेळ्या चरायला गेले होते. रात्री उशिरा घरी परतत असताना हे कुटुंब एका तलावाजवळून जात होते. तेव्हा अचानक  मुलीचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. मुलीला वाचवण्यासाठी भाऊ व तिच्या आईनेही तलावात उडी मारली. मात्र पाण्याची खोली न कळल्याने एक एक करत कुटुंबातील ३ जणांसह एकूण ५ जण तलावात बुडाले. फिरोजा मलेक, तिची दोन मुले अब्दुल आणि मेहरा यांच्यासह गावातील सिमरन आणि सोहेल यांच्यासह पाच जणांचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेनंतर तिथे पोहोचलेल्या गावकऱ्यांना तलावाबाहेर पडलेल्या चप्पलवरून काही तरी घडल्याचा अंदाज आला. कोणी तरी बुडाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर गावकऱ्यांनी तलावातून पाच मृतदेह बाहेर काढून रुग्णलायात नेले. 

दरम्यान, महिन्याभरापूर्वी उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातही असाच प्रकार घडला होता. गंगा नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेत आधी दोन जण बचावले होते. मात्र, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सर्वजण खोल पाण्यात गेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघातPoliceपोलिस