मोठ्या उद्योगासाठी गिरीराज सिंहांना साकडे सी.आर.पाटील समन्वय साधणार : उद्योजकांनी घेतली विमानतळावर भेट
By Admin | Updated: December 14, 2015 00:16 IST2015-12-14T00:16:52+5:302015-12-14T00:16:52+5:30
जळगाव : औरंगाबादच्या तुलनेत जळगावात औद्योगिक विकास जास्त होता. मात्र दरम्यानच्या काळात एकही मोठा उद्योग जळगावात नसल्याने येथील औद्योगिक विकास खुंटला आहे. जळगाव शहरात आय.टी. किंवा ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबधित एक मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती जिंदाच्या पदाधिकार्यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांना घालण्यात आले.

मोठ्या उद्योगासाठी गिरीराज सिंहांना साकडे सी.आर.पाटील समन्वय साधणार : उद्योजकांनी घेतली विमानतळावर भेट
ज गाव : औरंगाबादच्या तुलनेत जळगावात औद्योगिक विकास जास्त होता. मात्र दरम्यानच्या काळात एकही मोठा उद्योग जळगावात नसल्याने येथील औद्योगिक विकास खुंटला आहे. जळगाव शहरात आय.टी. किंवा ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबधित एक मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती जिंदाच्या पदाधिकार्यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांना घालण्यात आले.रविवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास राज्यमंत्री गिरीराज सिंह यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिंदाचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, अंजनीप्रसाद मुंदडा, संजय तापडीया, रेमंडचे राहुल मिनारी, सुनील पाटील, दालमिल मालक मनोज नागला, दिनेश राठी, चटई उद्योजक किरण जोशी, अभिषेक सिंग, अरुण लाहोटी आदी उद्योजक उपस्थित होते. अंजनीप्रसाद मुंदडा यांनी माहिती देतांना सांगितले की, काही वर्षांपूर्वी जळगाव शहर हे औरंगाबाद पेक्षा समृद्ध होते. मात्र या ठिकाणी ऑटोमोबाईल इंडस्ट्रिज आल्यामुळे त्यांच्याशी संबधित लघुउद्योगाचे जाळे निर्माण झाले. त्यामुळे काही वर्षात औरंगाबादचा विकास झाल्याचे त्यांनी गिरीराज सिंग यांना सांगितले. जळगाव औद्योगिक वसाहतीत १२०० छोटे व मोठे उद्योग आहेत. त्यातील तब्बल ४० टक्के उद्योग हे बंदस्थितीत आहेत. आय.टी. किंवा ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबधित एक मोठा उद्योग जळगावात आणण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती त्यांनी यावेळी गिरीराज सिंग यांना केली.त्यावर सिंग यांनी जळगावातील औद्योगिक विकासासाठी खासदार सी.आर.पाटील हे समन्वयकांची भूमिका पार पाडतील असे आश्वासन दिले. तसेच जळगावात मोठा उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले.यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी, भाजपा अनुसूचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, भास्कर बोरोले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सोबत फोटो- ५९