शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा स्वभाव बदलण्यासाठी आले औषध, प्रसुतीपश्चात चिडचिडेपणा दूर करणार; एफडीएची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 07:00 IST

Health: प्रसूतीनंतर काही महिला चिडचिड्या होतात. त्यांच्यावरील मानसिक ताण वाढतो. त्याला पोस्टपार्टम असे म्हणतात. त्यावर तयार केलेल्या जुजुर्वे या नव्या औषधास अमेरिकेच्या फुड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) मंजुरी दिली आहे.

वॉशिंग्टन - प्रसूतीनंतर काही महिला चिडचिड्या होतात. त्यांच्यावरील मानसिक ताण वाढतो. त्याला पोस्टपार्टम असे म्हणतात. त्यावर तयार केलेल्या जुजुर्वे या नव्या औषधास अमेरिकेच्या फुड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (एफडीए) मंजुरी दिली आहे. अतिशय निराश असलेल्या रुग्णालाच हे औषध देण्यात येते व ते १४ दिवस घ्यावे लागते, असे संशोधकांनी सांगितले.

एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस विभागाच्या संचालक डॉक्टर रुशी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गर्भवती असताना तसेच प्रसूती झाल्यानंतर काही महिला विशिष्ट कारणांनी निराश होतात. या आजाराच्या लक्षणांकडे पूर्वी फारसे लक्ष दिले जात नव्हते किंवा लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे जायचे टाळत असत. प्रसूतीनंतर निराशावस्थेत असलेल्या महिलांच्या मनात कधीकधी आत्महत्येचेही विचार येतात. त्यांच्या मनावरचा ताण दूर करणारे प्रभावी औषध तयार करणे आवश्यक होते. ती कमतरता जुजुर्वे या औषधाने भरून काढली आहे. (वृत्तसंस्था)

असे आहेत काही दुष्परिणाम- अमेरिकेच्या एफडीएने सांगितले की, जुजुर्वे गोळीचे काही दुष्परिणामही आहेत. - ही गोळी घेतल्यानंतरचे पुढील १२ तास त्या रुग्णाने खूप शारीरिक कष्ट असलेले कोणतेही काम करू नये तसेच त्याला वाहन चालविण्यासही मनाई करण्यात आली आहे. - जुजुर्वे गोळी घेतल्यानंतर चक्कर येणे, थकावट, सर्दी, खोकला, मूत्रसंसर्ग असे काही दुष्परिणाम होऊ शकतात. - मात्र निराशा दूर करण्यासाठी घेतलेल्या औषधांचे दुष्परिणाम फार काळ टिकत नाही. त्यामुळे चिंतेचे कारण उरत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

‘औषधाचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर नको’स्तनपान करणाऱ्या महिलांवर जुजुर्वे या औषधाची चाचणी झाली आहे किंवा नाही याबद्दल अजून नीटशी माहिती उपलब्ध झालेली नाही. हे औषध मानसोपचार तज्ज्ञांनी रुग्णाला लिहून देणे योग्य आहे. पण सर्वच डॉक्टर सरसकट हे औषध घेण्याचा सल्ला देऊ लागले तर जुजुर्वेचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होण्याचा धोका आहे. त्यातून आणखी काही वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात, अशी वैद्यकीय तज्ज्ञांना भीती वाटते.  

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्य