शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गिलगिट-बाल्टिस्तानवरून भारताने पाकला खडसावले, राज्याचा दर्जा देण्याच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 05:26 IST

Gilgit-Baltistan : भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा.

नवी दिल्ली : गिलगिट-बाल्टिस्तानला तथाकथित राज्याचा दर्जा देण्याच्या हालचालीबद्दल भारताने पाकला रविवारी पुन्हा एकदा खडसावले आहे. या प्रकाराद्वारे पाकिस्तान पीओकेची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करून तो भाग बळकाविण्याचा कट रचत आहे. हा प्रकार कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असेही भारताने बजावले आहे.भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी गिलगिट-बाल्टिस्तान भागाला आम्ही राज्याचा दर्जा देणार आहोत, असे म्हटले आहे, तसेच या भागात निवडणुका घेण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यावर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे.अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगिट हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, हे आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करीत आहोत. पाकने बेकायदेशीररीत्या आणि बळजबरीने गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग बळकावला आहे. पाकिस्तानचा हा प्रयत्न म्हणजे मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रकार होय. या भागातील नागरिकांवर पाकिस्तानने सात दशके अत्याचार केले असून, ते झाकण्यासाठीच ही खेळी खेळली जात आहे. या भागाला प्रांताचा दर्जा देण्याऐवजी तो भाग भारताला परत केला पाहिजे.

भारताने नोंदविला तीव्र आक्षेप - या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सरकारला २०१८ मधील प्रशासनिक आदेशात दुरुस्ती करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, या भागात सार्वत्रिक निवडणुका घेण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या राजदूतांना बोलावून पाकिस्तानच्या या हालचालींबाबत तीव्र आक्षेप नोंदविला होता.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान