पाक उच्चायुक्त गिलानींना भेटलेच
By Admin | Updated: August 20, 2014 02:44 IST2014-08-20T02:44:15+5:302014-08-20T02:44:15+5:30
पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी आज काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांची भेट घेतलीच.

पाक उच्चायुक्त गिलानींना भेटलेच
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील नियोजित चर्चा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या इशारेवजा पवित्र्याला अजिबात न जुमानता पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी आज काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांची भेट घेतलीच.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांशी बासित यांनी भेट ठरविल्यामुळे केंद्राने परराष्ट्र सचिव पातळीवरील नियोजित चर्चा सोमवारी रद्द करून टाकली. पण या पवित्र्यावर नरमाईने घेण्याऐवजी आम्ही काही भारताचे बटीक नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली. शिवाय बासित यांनी दिल्लीत गिलानी यांच्यासोबतची भेटही पार
पाडली. परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याचे सय्यद शाह गिलानी म्हणाले.
हिंदू सेनेच्या कार्यकत्र्यानी पाक दूतावासाबाहेर जोरदार निदर्शने केली. निदर्शकांनी ‘वंदे मारतम्’, ‘भारत माता की जय’ व ‘पाकिस्तानी उच्चायुक्त परत जा’ अशा घोषणा दिल्या.
च्पाकिस्तानशी चर्चा रद्द केल्याबद्दल काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आणि परराष्ट्र सचिव पातळीवर चर्चा रद्द केल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले.
च्भारत-पाकिस्तान दरम्यानची नियोजित चर्चा रद्द होणो दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेने नोंदविली आहे.