शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुलाम, शिंदे, हिमंता... अदानी; राहुल गांधींनी पझलमधून ते २०००० कोटी कोणाचे, हे पुन्हा विचारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 16:12 IST

अदानींच्या आडनावात किती नावे लपलित? राहुल गांधी यांनी आपल्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांना टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. हे नेते आता भाजपात गेलेत.

एकीकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अदानींवर टीका करण्यात काही अर्थ नाही असे सांगितले असताना तिकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वर्ड पझलमधून अदानींच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये काही लोकांची नावे-आडनावे जोडून ते २० हजार कोटी रुपये कोणाचे असा प्रश्न पुन्हा विचारला आहे. यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता आहे. 

आज राहुल गांधी यांनी एक शब्द कोड्याचा फोटो पोस्ट केला. त्यात अदानी असे मोठ्या अक्षरात आहे. परंतू, त्यानंतर जी नावे त्यांनी जोडली आहेत, त्यावरून हे लोक माजी काँग्रेसी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हे लोक आता भाजपात गेले आहेत. या लोकांनी राहुल यांची साथ सोडली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे असल्याचेही अंदाज लावले जात आहेत. 

कोणाकोणाचे नाव?यामध्ये राहुल यांनी कोणाचे थेट पूर्ण नाव घेतलेले नाहीय. परंतू, ट्विट करताना त्यांनी ''खरे लपवत आहेत, म्हणून रोज भटकवत आहेत. प्रश्न तेच आहेत. अदानींच्या कंपन्यांमध्ये २० हजार कोटींचा काळा पैसा कोणाचा आहे?'' असा सवाल केला आहे. नावांवरून तरी राजकीय वर्तुळात हेच लोक असल्याचे बोलले जात आहे. 

यामध्ये गुलाम, सिंधिया, किरण, हिमांता, अनिल अशी नावे ADANI मध्ये खाली वर जोडली आहेत. यानुसार हे नेते गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिश्व शर्मा आणि अनिल अँटोनी अशी नावे असतील असा अंदाज आहे. 

अनिल अँटोनी यांनी यावर लगेचच पलटवार केला आहे. मोठ्या नेत्यांसोबत माझे नाव घेतल्याने मी खूश आहे. तुम्ही जी नावे लिहिलात ती गद्दारांची नाहीत. हे लोक कुटुंबासाठी नाही तर देशासाठी काम करणारे लोक आहेत, असे ट्विट अनिल यांनी केले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAdaniअदानीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेस