शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

गुलाम नबी कॉंग्रेसमधून 'आझाद', पाच दशकांनंतर पाच पानी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 05:29 IST

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जवळपास पाच दशकांच्या सोबतीनंतर शुक्रवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

नवी दिल्ली :

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जवळपास पाच दशकांच्या सोबतीनंतर शुक्रवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अलीकडच्या काळात कपिल सिब्बल व आणि अश्विनीकुमार यांसारख्या दिग्गज होता. आझाद यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राजीनामा देताना आझाद यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाच पानी पत्र लिहिले. देशातील सर्वात जुना पक्ष आता पूर्णपणे नष्ट झाला असून, सध्या बनावट संघटनात्मक निवडणुकीच्या नावाखाली धोका दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय जड अंत:करणाने घेत आहोत. दरबारी मंडळी पक्ष चालवत असून, त्यामुळे पक्ष देशासाठी लढण्याची इच्छाशक्ती व क्षमता गमावून बसला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आझाद यांनी अलीकडेच जम्मू-काश्मीर प्रदेश प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आझाद यांची कृती दुर्दैवी असून, पक्ष महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून भाजपशी लढत असताना राजीनामा दिला. राजीनाम्यासाठी निवडलेली वेळ भयंकर आहे, असे काँग्रेसने म्हटले,

राजीनामापत्रात काय म्हटले आहे?संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया एक फार्सपक्षातील संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला फार्स संबोधून ते म्हणाले की, पक्षात कोणत्याही स्तरावर निवडणूक झालेली नाही. २४ अकबर रोडवर बसलेल्या अ. भा. काँग्रेस समितीच्या, (एआयसीसी) निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना एआयसीसी चालवणाऱ्या छोट्या गटांनी तयार केलेल्या याद्यांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले.सोनिया गांधी केवळ नावापुरत्या नेत्याराहुल गांधी यांनी सर्व वरिष्ठ अपमानित केल्यानंतर घाईगडबडीने राजीनामा दिला आणि त्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून तुम्ही पदभार सांभाळला. हे पद आपण तीन वर्षापासून सांभाळत आहात. सोनिया गांधी आता केवळ नावापुरत्या नेत्या आहेत.

सल्लामसलत प्रणाली उद्ध्वस्त, खुशामतखोरांकडे सत्रे काँग्रेसच्या व दुर्दैवाने राहुल गांधी यांच्या राजकारण प्रवेशानंतर विशेषकरून जानेवारी २०१३ नंतर (जेव्हा तुम्ही त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवले) तत्पूर्वी अस्तित्वात असलेली पक्षाची सल्लामसलत प्रणाली त्यांनी उदध्वस्त केली. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला सारून नव्या अननुभवी, खुशामतखोरांच्या हाती पक्षाची सूत्रे देण्यात आली. राहुल गांधी यांचे सुरक्षारक्षक, खासगी सचिव निर्णय घेतात या रिमोट कंट्रोल मॉडेलने आधी संपुआ सरकारची संस्थात्मक एकात्मता नष्ट केली आणि आता पक्षाची.

४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ ठिकाणी काँग्रेसचा पराभव२०१४ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पराभव झाला. नंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. २०१४ ते २०२२ दरम्यान ४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ निवडणुकांत काँग्रेसच्या वाट्याला पराभव आला.अपरिपक्व कृतीमुळेच पक्षाचा पराभवसंपुआ सरकारच्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यादेशाच्या प्रती फाडल्याच्या घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले की, अपरिपक्वतेचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. या बालिश कृतीने पंतप्रधान आणि भारत सरकारच्या प्रतिमेवर मोठा आघात झाला. या कृतीनेच २०१४ च्या निवडणुकीत संपुआला पराभवाचे तोंड पहावे लागले.काँग्रेस पूर्णपणे नष्ट,आता स्थिती बदलणे अशक्य दुर्दैवाने कॉंग्रेसची स्थिती या स्तरावर गेली आहे की, परतीचा मार्ग दिसत नाही. पक्षाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी ते आता प्रतिनिधी तयार करू लागले आहेत. मात्र, हा प्रयोगही फसणार आहे. कारण, काँग्रेस पूर्णपणे नष्ट झालेली असून, ही स्थिती बदलता येऊ शकत नाही.भारत जोडो नव्हे, काँग्रेस जोडो यात्रेची गरजबूथ, ब्लॉक, जिल्हा किंवा राज्य स्तरावर कुठेही मतदार यादी प्रकाशित केलेली नाही. पक्षाशी झालेल्या या विश्वासघातासाठी नेतृत्व जबाबदार आहे. भारत जोडो यात्रा काढण्यापूर्वी काँग्रेस जोडो यात्रा काढायला हवी.,हा काही परिपक्व निर्णय नाही. आझाद हे दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये होते. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत आणि राहतील. पक्षासाठी काही करणे हे आमचे कर्तव्य आहे. कहानी यह नहीं की वे गए, कहानी ये है की हम नहीं जा रहे हैं.-सलमान खुर्शीद, काँग्रेस नेते 

आझाद यांनी नेतृत्वावर केलेले आरोप अयोग्य आहेत. ज्यांची ओळखच देशात काँग्रेसमुळे आहे, त्यांच्याकडून अशी विधाने अपेक्षित नाहीत. ज्या व्यक्तीला पक्षाने ४२ वर्षे पदाशिवाय ठेवले नाही ती व्यक्ती काँग्रेसबाबत अशी वक्तव्ये करते, याची अपेक्षा नव्हती.-अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

 

टॅग्स :congressकाँग्रेस