शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

"गझनवी तर भारतीयच होता...!"; माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारींच्या विधानावरून वाद, भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:42 IST

अन्सारी यांनी आपल्या मुलाखतीत अफगाणिस्तानपर्यंतचा प्रदेश त्या काळी भारताचाच भाग असल्याचे सांगत, असा तर्क मांडला की, जर तो भाग भारताचा होता, तर तिथून आलेले लोकही भारतीयच होते. 

माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी भारतीय इतिहासासंदर्भात केलेल्या एका विधानावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. "महमूद गझनवी आणि लोधी हे बाहेरून आले नव्हे, ते भारतीयच लुटारू होते," असे अन्सारी एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. त्यांच्या या विधानावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच, काँग्रेसची संपूर्ण व्यवस्थाच हिंदुविरोधी लोकांचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप केला आहे.

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी अन्सारींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. "हामिद अन्सारींचे विधान ही काही एकाकी घटना नाही, तर काँग्रेस कशा पद्धतीने हिंदुविरोधी लोकांचे महिमामंडन करते, याचे ताजे उदाहरण आहे. ज्या गझनवीने सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले. ते अपवित्र केले, त्याचे गुणगान काँग्रेसची ही इकोसिस्टम करत आहे," असे पूनावाला यांनी म्हटले आह. एवढेच नाही तर, हे लोक औरंगजेब आणि हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालतात, असेही पुनावाला म्हणाले.

अन्सारी यांनी आपल्या मुलाखतीत अफगाणिस्तानपर्यंतचा प्रदेश त्या काळी भारताचाच भाग असल्याचे सांगत, असा तर्क मांडला की, जर तो भाग भारताचा होता, तर तिथून आलेले लोकही भारतीयच होते. 

२००७ मध्ये उपराष्ट्रपती होण्यापूर्वी अन्सारी काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी उल्लेख असलेला महमूद गझनवी हा गझनवी वंशाचा शासक होता, ज्याने भारतावर अनेक आक्रमणे करत लुटालूट केली होती. तर लोधी वंशाचा शेवटचा शासक इब्राहिम लोधी याचा १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने पराभव केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Row over Hamid Ansari's statement: Ghaznavi was Indian, BJP slams Congress

Web Summary : Hamid Ansari's remark that Ghaznavi and Lodhi were Indian looters sparked controversy. BJP criticized Congress, alleging pro-Hindu-opposing stance. Ansari claimed historical Afghanistan was part of India.
टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा