खंबीर नेतृत्त्वामुळेच पाकला धडा मिळाला

By Admin | Updated: October 4, 2016 04:45 IST2016-10-04T04:45:54+5:302016-10-04T04:45:54+5:30

आतापर्यंत देशाला खंबीर नेतृत्त्व नसल्याने लष्कराचे हात बांधलेले होते. मात्र देशाला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने खंबीर नेतृत्त्व मिळाले आहे

Getting a Lesson Lesson From A Strong Leadership | खंबीर नेतृत्त्वामुळेच पाकला धडा मिळाला

खंबीर नेतृत्त्वामुळेच पाकला धडा मिळाला

अहमदनगर : आतापर्यंत देशाला खंबीर नेतृत्त्व नसल्याने लष्कराचे हात बांधलेले होते. मात्र देशाला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने खंबीर नेतृत्त्व मिळाले आहे. त्यामुळेच ‘सर्जिकल स्ट्राईक’ यशस्वी करून पाकिस्तानला धडा शिकविता आला. या कारवाईमुळे सर्वच देशांनी आता पाकिस्तानला एकटे पाडले आहे,अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतदार नोंदणी अभियानाबाबत नगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मतदार नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या खास मोबाईल अ‍ॅपचे भामरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. खा. दिलीप गांधी, निवडणूक प्रचार प्रमुख आ. नरेंद्र पवार, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. ते म्हणाले, जनकल्याणाची कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी राज्यसभा आणि राज्यांच्या विधान परिषदांमध्ये भाजपाचे वर्चस्व असले पाहिजे. म्हणून प्रत्येक निवडणूक गंभीरपणे घेऊन उमेदवारांचा प्रचार करावा. हाच भाजपाचा अजेंडा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Getting a Lesson Lesson From A Strong Leadership