शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्याला रागावणे, खडसावणे हे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; शिक्षकाने रागावणे गरजेचेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:56 IST

नेमके काय आहे प्रकरण? का केली होती आत्महत्या? वाचा सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: एखाद्याला रागावणे किंवा खडसावणे म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे नव्हे, असे निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केले. वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने शाळा व वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवले होते. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर होता.

रागावल्याने किंवा खडसावल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करेल अशी कल्पनादेखील सामान्य व्यक्ती करू शकत नसल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला व न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने नोंदवले.

याची कल्पनाच शक्य नाही

  • संपूर्ण प्रकरणाचा सारासार विचार केल्यानंतर हस्तक्षेप करण्यासाठी आम्हाला हा योग्य खटला वाटला.
  • एका विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून शिक्षक दुसऱ्या विद्यार्थ्याला रागवत असेल, त्यानंतर विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलेल अशी कल्पना कोणीही करू शकणार नाही. मृत विद्यार्थ्याविरोधात दुसऱ्या विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी व उपाययोजनासाठी शिक्षकाला किमान रागावणे गरजेचे होते, असे न्यायालय म्हणाले.

नेमके काय आहे प्रकरण? का केली होती आत्महत्या?

  • वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याबद्दल शिक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर शिक्षकाने तक्रारदार मुलाला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्याला खडसावले होते.
  • त्यानंतर विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास गेतला. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयानेदेखील शिक्षकाला दोषी ठरवले होते.
टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकCourtन्यायालय