शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लवकर बरे व्हाल... डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी PM मोदींची प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 13:49 IST

मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना 29 एप्रिलला सोडण्यात आले होते.

ठळक मुद्देमनमोहनसिंग यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच देशभरातून त्यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधानमनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनीही ट्विट करुन ते लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना केली आहे. 

मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून ते छातीत श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार करत होते. त्यांना ताप आल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने त्यांना एम्सच्या केसी.एन टॉवरमध्ये भरती करण्यात आले आहे. मनमोहन सिंगांवर उपचारासाठी लगेचच एम्सने एक मेडिकल टीम तयार केली असून या एम्स टीमचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया नेतृत्व करत आहेत. 

मनमोहनसिंग यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच देशभरातून त्यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रार्थना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन, डॉ. सिंग यांची तब्येत लवकरच ठणठणीत होवो, ही प्रार्थना केली आहे. तर, माज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्विट करुन मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी  मी आणि संपूर्ण कुटुंब माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत, देशभरातून डॉ. साहेबांसाठी प्रार्थना करण्यात येत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. 

दरम्यान, मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना 29 एप्रिलला सोडण्यात आले होते. आता पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे.  

टॅग्स :prime ministerपंतप्रधानManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीAIIMS hospitalएम्स रुग्णालय