सौदी अरबमध्ये बंधक असलेल्या उत्तर भारतीयांना सोडवा

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:26+5:302015-02-10T00:56:26+5:30

नागपूर : नोकरीचे आमिष दाखवून मुंबईच्या जमीर इंटरप्राईजेस मॅन पॉवर सप्लाय एजन्सीने राजस्थान, बिहार व उत्तर प्रदेशातील २४ नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन सौदी अरबमध्ये नोकरीसाठी पाठविले. हे नागरिक सौदीमध्ये जाऊन फसले आहेत. तेथे या नागरिकांचा छळ होत आहे. त्यांच्याजवळील पैसे संपले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पासपोर्ट स्थानिक सरकारने जप्त केले आहे. त्यांना बंधक बनवून ठेवले आहे. यातील चार लोक उत्तर प्रदेशातून नागपुरात रोजगारासाठी आले होते. नागपुरात राहणारे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात उत्तर भारतीय सभेचे विदर्भ अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. कळमना पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. या बंधक ठेवलेल्या न

Get rid of northern Indians who are in Saudi Arabia | सौदी अरबमध्ये बंधक असलेल्या उत्तर भारतीयांना सोडवा

सौदी अरबमध्ये बंधक असलेल्या उत्तर भारतीयांना सोडवा

गपूर : नोकरीचे आमिष दाखवून मुंबईच्या जमीर इंटरप्राईजेस मॅन पॉवर सप्लाय एजन्सीने राजस्थान, बिहार व उत्तर प्रदेशातील २४ नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन सौदी अरबमध्ये नोकरीसाठी पाठविले. हे नागरिक सौदीमध्ये जाऊन फसले आहेत. तेथे या नागरिकांचा छळ होत आहे. त्यांच्याजवळील पैसे संपले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे पासपोर्ट स्थानिक सरकारने जप्त केले आहे. त्यांना बंधक बनवून ठेवले आहे. यातील चार लोक उत्तर प्रदेशातून नागपुरात रोजगारासाठी आले होते. नागपुरात राहणारे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात उत्तर भारतीय सभेचे विदर्भ अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे. कळमना पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. या बंधक ठेवलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका व्हावी, अशी मागणी अग्निहोत्री यांनी पत्रपरिषदेत केली.

Web Title: Get rid of northern Indians who are in Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.