धावडेला जामीन
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30
भूखंड बळकाव प्रकरणात

धावडेला जामीन
भ खंड बळकाव प्रकरणात अनिल धावडेला जामीन नागपूर : महाल बडकस चौक येथील हयात नसलेल्या मनपाच्या निवृत्त शिक्षणाधिकारी सिंधूताई इलमुलकर यांचा २२९४.२९ चौरस फुटाचा कोट्यवधीचा भूखंड हडपल्याप्रकरणी नगरसेवक अनिल धावडे याचा जामीन अर्ज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जे.आर. घाडगे यांच्या न्यायालयाने मंजूर केला. २५ हजाराची रोख सुरक्षा आणि तेवढ्याच रकमेच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर न्यायालयाने धावडेला सोडण्याचा आदेश दिला. कोतवाली पोलिसांनी अनिल धावडे आणि राजू भद्रे, अशा दोघांना २५ जुलै रोजी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करून सखोल तपास करण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने धावडे याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावून भद्रेला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. २६ जुलै रोजीच भद्रेला जामीन मंजूर करण्यात आला होता. २९ जुलै रोजी न्यायालयाने धावडेला न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची रवानगी कारागृहात केली होती. बचाव पक्षाने दाखल केलेल्या धावडेच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयात आरोपीच्या वतीने ॲड. आर. के. तिवारी आणि ॲड. लुबेश मेश्राम यांनी काम पाहिले.