शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

"बाहेर या, मतदान करा"; सचिनकडून नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मतदानाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 15:36 IST

क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सचिन राजकीय मैदानात मतदारांसाठी बॅटींग करताना दिसतआहे. 

देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आज छत्तीसगडमध्ये मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतरत्न सचिन तेंडुलकरने छत्तीसगडमधील नागरिकांना मतदानाचं आवाहन केलंय. हर एक Vote जरुरी होता है, असे म्हणत सचिनने मतदारानां मतदान करण्याचं आवाहन केलंय. निवडणूक आयोगाने मतदारांना आकर्षित आणि प्रोत्साहित करण्यासाठी क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकरची "राष्ट्रीय आयकॉन" म्हणून निवड केली आहे. क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सचिन राजकीय मैदानात मतदारांसाठी बॅटींग करताना दिसतआहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ECI ने गेल्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली होती. त्यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी कर्णधार एम.एस. धोनी, अभिनेता आमिर खान आणि बॉक्सर मेरी कोम सारख्या दिग्गजांना देखील ECI ने राष्ट्रीय आयकॉन म्हणून निवडले होते. यंदा निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची 'नॅशनल आयकॉन' म्हणून निवड केली आहे. त्यामुळे, सचिन तेंडुलकरचा फोटो वापरुन मतदान जनजागृती केली जात आहे.  छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतू, हा भाग नक्षलग्रस्त असल्याने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान घेतले जाणार आहे. २० पैकी १० मतदारसंघांत ही वेळ आहे, असे असताना मतदारांना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांच्या छायेखाली मतदानाला यावे लागत आहे. आता, सचिन तेंडुलकरनेही मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. सचिनने निवडणूक आयोगाचे ट्विट रिट्विट करत, आज मतदानाचा दिवस असल्याचं म्हटलं. प्रत्येक मत हे आपल्या भविष्याचा आवाज आहे. म्हणून, बाहेर पडा आणि मतदान करा. जबाबदार मतदार व्हा आणि मतदान करा. मिझोरम आणि छत्तीसगडमध्ये मतदान करा, असे आवाहन सचिनने केले आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत 22.18% मतदान झाले आहे. 

सचिन, ३ वर्षांसाठी नॅशनल आयकॉन

सचिन तेंडुलकर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती आणि शिक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित करणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्या उपस्थितीत सचिनने 'नॅशनल आयकॉन' म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली. सचिनसोबत 3 वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. विशेषत: तरुण मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सचिनची या कामासाठी निवड करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे निवडणूक आणि सामान्य जनता, विशेषतः तरुण आणि शहरी लोकांमधील दरी भरुन काढण्याचे काम केले जाईल. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडVotingमतदानSachin Tendulkarसचिन तेंडुलकरElectionनिवडणूक