शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

संघटित व्हा, एकोपा दाखवा...जोड

By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST

काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसशिवाय विकास शक्य नाही, ही भावना लोकांमध्ये तयार होऊ लागली आहे. झोपी गेल्याचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे प्रास्ताविकात म्हणाले, चव्हाण यांच्याहाती सूत्रे आल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दोन वर्षांनी महापालिका व जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक येत आहे. गेल्या काळात महापालिकेत भाजपने केलेल्या घोटाळ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. येत्या काळात पुन्हा एकदा भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यास्

काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसशिवाय विकास शक्य नाही, ही भावना लोकांमध्ये तयार होऊ लागली आहे. झोपी गेल्याचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे प्रास्ताविकात म्हणाले, चव्हाण यांच्याहाती सूत्रे आल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दोन वर्षांनी महापालिका व जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक येत आहे. गेल्या काळात महापालिकेत भाजपने केलेल्या घोटाळ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. येत्या काळात पुन्हा एकदा भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

चौकट...
जंगी स्वागत, देवडिया खचाखच भरले
लोकसभेतील पराभव, पाठोपाठ विधानसभेतील पराभवानंतर देवडिया काँग्रेस भवनातील गर्दी ओसरली होती. बरेच नेते व नगरसेवक देवडियाच्या पायऱ्याही चढत नव्हते. शनिवारी मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जवळपास सर्वच नेते आले. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. देवडिया बऱ्याच दिवसांनी खचाखच भरले होते. विमानतळावरही स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मौदा येथे जात असतानाही रस्त्यात बऱ्याच ठिकाणी त्यांचा ताफा थांबवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. या जंगी स्वागतामुळे चव्हाण भारावून गेले.

चौकट..
वडेट्टीवार यांचा खिसा रिकामा
विमानतळ, रविभवन व देवडिया काँग्रेस भवनात अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. गर्दीत अनेकांचे पाकीट मारल्या गेले. आ. विजय वडेट्टीवार यांच्या खिशातील पैसे चोरट्यांनी साफ केले. काही काँग्रेस नेत्यांनाही असाच फटका बसला. काँग्रेसच्या कार्यक्रमांना गर्दी होऊ लागली आहे, याचा अंदाज चोरट्यांनाही आला आहे, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली होती.