संघटित व्हा, एकोपा दाखवा...जोड
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30
काँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसशिवाय विकास शक्य नाही, ही भावना लोकांमध्ये तयार होऊ लागली आहे. झोपी गेल्याचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे प्रास्ताविकात म्हणाले, चव्हाण यांच्याहाती सूत्रे आल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दोन वर्षांनी महापालिका व जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक येत आहे. गेल्या काळात महापालिकेत भाजपने केलेल्या घोटाळ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. येत्या काळात पुन्हा एकदा भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यास्

संघटित व्हा, एकोपा दाखवा...जोड
क ाँग्रेसचे पुनरुज्जीवन होत आहे. काँग्रेस संपणार नाही. ती प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे. भाजप-सेनेने भावनात्मक मुद्दे घेतले. काँग्रेसी मतांचे विभाजन करून मते मिळवली. अपप्रचार करून सत्तेवर आले. मात्र, गेल्या आठ महिन्यात नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसशिवाय विकास शक्य नाही, ही भावना लोकांमध्ये तयार होऊ लागली आहे. झोपी गेल्याचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे प्रास्ताविकात म्हणाले, चव्हाण यांच्याहाती सूत्रे आल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दोन वर्षांनी महापालिका व जिल्हा परिषद ही कार्यकर्त्यांची निवडणूक येत आहे. गेल्या काळात महापालिकेत भाजपने केलेल्या घोटाळ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. येत्या काळात पुन्हा एकदा भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. चौकट...जंगी स्वागत, देवडिया खचाखच भरले लोकसभेतील पराभव, पाठोपाठ विधानसभेतील पराभवानंतर देवडिया काँग्रेस भवनातील गर्दी ओसरली होती. बरेच नेते व नगरसेवक देवडियाच्या पायऱ्याही चढत नव्हते. शनिवारी मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जवळपास सर्वच नेते आले. कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. देवडिया बऱ्याच दिवसांनी खचाखच भरले होते. विमानतळावरही स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मौदा येथे जात असतानाही रस्त्यात बऱ्याच ठिकाणी त्यांचा ताफा थांबवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. या जंगी स्वागतामुळे चव्हाण भारावून गेले.चौकट..वडेट्टीवार यांचा खिसा रिकामा विमानतळ, रविभवन व देवडिया काँग्रेस भवनात अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. गर्दीत अनेकांचे पाकीट मारल्या गेले. आ. विजय वडेट्टीवार यांच्या खिशातील पैसे चोरट्यांनी साफ केले. काही काँग्रेस नेत्यांनाही असाच फटका बसला. काँग्रेसच्या कार्यक्रमांना गर्दी होऊ लागली आहे, याचा अंदाज चोरट्यांनाही आला आहे, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात रंगली होती.