संघटना घराघरात पोहचवा

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:31+5:302015-08-31T21:30:31+5:30

संघटना घराघरात पोहचवा

Get the organization home | संघटना घराघरात पोहचवा

संघटना घराघरात पोहचवा

घटना घराघरात पोहचवा
रावसाहेब दानवे : उमरेडमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
उमरेड : पक्षाची सदस्य मोहीम सक्रियतेने राबवा. सदस्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करा; सोबतच आपली संघटना घराघरात पोहचवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उमरेड येथे कार्यकर्त्यांना केले.
मूल (जि. चंद्रपूर) येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांचे बायपास चौकात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर विश्रामगृह येथे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आ. सुधीर पारवे, आ. बंटी भांगडिया, प्रदेश सचिव जमाल सिद्दीकी, आनंद राऊत, दामोदर मुंधडा, विकास गिरी, रूपचंद कडू, गोविंद इटनकर, दिनेश तिमांडे, अरुण गिरडकर, डॉ. मुकेश मुदगल, धनंजय अग्निहोत्री, संजय जयस्वाल, पुष्पा कारगावकर, सोपान कारगावकर, उमेश हटवार, अनिल उन्नरकर, दिलीप सोनटक्के, सुभाष कावटे, प्रदीप चिंदमवार, घनश्याम लव्हे, उमेश वाघमारे, गिरीश लेंडे, मुकेश आंबोने, महेश मरघडे, नेमाजी वराडे, कृष्णा कामडी, मुन्ना बुटोलिया, नंदू मानकर, किशोर हजारे आदींसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

Web Title: Get the organization home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.