शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माझी बायको परत मिळवून द्या; संसारात सासरच्यांच्या हस्तक्षेपाला कंटाळलेल्या पतीची कोर्टाकडे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 10:49 IST

बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे

ठळक मुद्दे बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहेपत्नीच्या माहेरच्या माणसांच्या या वागणुकीला कंटाळलं असल्याचंही या व्यक्तीने याचिकेत म्हंटलं आहे

नवी दिल्ली, दि. 1- पती-पत्नीमधील काही कारणावरून झालेली किरकोळ भांडण लगेच मिटतात. पण अनेकदा मोठ्या कारणांवरून झालेली भांडण कोर्टापर्यंत पोहचतात. ही भांडणं घटस्फोटापर्यंत जातात आणि एकमेकांपासून वेगळं होण्याचं पती-पत्नी ठरवतात. एका व्यक्तीने कोर्टाकडे त्याची बायको परत मिळविण्यासाठी अपील केलं आहे. बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. पत्नीच्या माहेरच्या माणसांच्या या वागणुकीला कंटाळलं असल्याचंही या व्यक्तीने याचिकेत म्हंटलं आहे.  न्यायाधीश संजय गर्ग यांनी अर्जावर सुनावणी करताना याचिकाकर्त्याच्या मागणीनुसार पत्नीला नोटीस पाठवत 23 जानेवारी 2018 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

रोबॉटिक इंजिनिअर असलेल्या याचिकाकर्ता पतीचा आरोप आहे की, पत्नीच्या माहेरच्या लोकांचं प्रमाणापेक्षा जास्त प्रेम आणि वारंवार आमच्या वैवाहिक आयुष्यात दखल देण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलं आहे. वकिल पियुष जैन यांनी हिंदू विवाह कायद्याचा 1995 मधील कलम 9 अंतर्गत याचिका दाखल करताना पत्नीला पुन्हा सासरी परतण्याचे आणि वैवाहिक आयुष्याला सुरुवात करण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे. 

याचिकाकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी ही एका कंपनीत सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. वर्षाला 5 लाख इतकं तिचं उत्पन्न आहे. ती 3 मेपासून तिच्या माहेरी राहते. कुठलंही कारण नसताना पत्नी माहेरी निघून गेली, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. या दोघांचं 25 जानेवारी 2016 रोजी दिल्लीमध्ये लग्न झालंय लग्नानंतर ते दोघे कडकडडूमा कोर्टाच्या जवळील एजीसीआर एन्क्लेवमध्ये राहत होते. त्याच्या पत्नीचं माहेर गाजियाबादच्या स्वर्णजयंती पुरममध्ये आहे. लग्नानंतर ते दोघं सव्वा वर्ष एकत्र राहिले होते. त्या दरम्यान त्याची पत्नी गरोदर होती. पण पत्नीच्या माहेरकडच्या लोकांच्या बेजबाबदारपणामुळे तीन महिन्याच्या आत काही कारणाने गर्भपात झाला, असा आरोप त्या याचिकाकर्त्या व्यक्तीने केला आहे. पत्नीच्या घरचे काहीना काही कारण देऊन तिला माहेरी घेऊन जात असायचे आणि लवकर घरी पाठवत नसायचे. माहेरी जायला नकार दिल्यावर ती भांडणं करायची. त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून ती घरी निघून जायची, असा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. 

या सगळ्या प्रकाराला कंटाळून पीडित व्यक्तीने अखेरीस कोर्टात धाव घेतली आहे.  

टॅग्स :Courtन्यायालय