घटस्फोट घेण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीसाठी गायलं गाणं, कोर्टाच्या पायरीवर पुन्हा पटवलं

By शिवराज यादव | Published: August 28, 2017 12:05 PM2017-08-28T12:05:49+5:302017-08-28T17:35:33+5:30

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरुन पती-पत्नीमध्ये सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत कधी जाऊन पोहोचतं हे त्यांच त्यांनाच कळत नाही.

A man sings song for his wife who urge for divorce | घटस्फोट घेण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीसाठी गायलं गाणं, कोर्टाच्या पायरीवर पुन्हा पटवलं

घटस्फोट घेण्यासाठी पोहोचलेल्या पत्नीसाठी गायलं गाणं, कोर्टाच्या पायरीवर पुन्हा पटवलं

googlenewsNext

झांसी, दि. 28 - अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरुन पती-पत्नीमध्ये सुरु झालेलं भांडण घटस्फोटापर्यंत कधी जाऊन पोहोचतं हे त्यांच त्यांनाच कळत नाही. एकदा का पाऊल उचललं की ते माघारी घेण्यातही अनेकांना कमीपणा वाटतो. आपण इगो मोठा असल्याने नमतं घेण्यास कोणी तयार नसतं. पण जर समोरची व्यक्ती संतापली असेल तर आपण शांत राहणं गरजेचं आहे हा साधा नियम अनेकजण डावलतात आणि थेट कोर्टाच्या पायरीपर्यंत जाऊन पोहोचतात. पण कोर्टाच्या पायरीवरही आपला संयम बाळगून पत्नीला मनवणा-या एका पतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

झांसी येथील कौटुंबिक सल्ला केंद्रातील ही घटना आहे. यावेळी आपल्या नाराज पत्नीसाठी महोदयांनी कोर्टाच्या आवारातच गाणं गाण्यास सुरुवात केली. पती महोयदयांनी बदलापूर चित्रपटातील ‘ना सीखा मैंने जीना-जीना’ गाणं गाण्यास सुरुवात केली आणि उपस्थित सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. सुरुवातीला नेमकं काय चालू आहे कोणालाच कळेना. पण समोर पत्नी उभी असल्याचं लक्षात येताच सर्वांनी शांत राहून पत्नी काय प्रतिक्रिया देते पाहू लागले. पतीने गाणं गायला सुरुवात करताच पत्नीचं मन वळलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. 

ज्या पतीवर पत्नी नाराज झाली होती, त्याच्याच खांद्यावर डोकं ठेवून पत्नी रडू लागली. कोर्टाच्या आवारातील हे क्षण पाहून उपस्थितही थोडे भावूक झाल्याचं पहायला मिळालं. पतीने गाणं गायचं बंद करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. 

Web Title: A man sings song for his wife who urge for divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.