जीमेल वर मिळवा आता ५० एमबी पर्यंत ई-मेल
By Admin | Updated: March 2, 2017 18:49 IST2017-03-02T18:49:38+5:302017-03-02T18:49:38+5:30
जीमेल ही ई-मेल पाठवण्यासाठी गुगलने उपलब्ध केलेली प्रणाली आहे. कुठल्याही गुगल युजर्सला जीमेल फुकट वापरता येते अर्थात त्याचे गुगल अकाउंट

जीमेल वर मिळवा आता ५० एमबी पर्यंत ई-मेल
>- अनिल भापकर
औरंगाबाद, दि.02 - जीमेल ही ई-मेल पाठवण्यासाठी गुगलने उपलब्ध केलेली प्रणाली आहे. कुठल्याही गुगल युजर्सला जीमेल फुकट वापरता येते अर्थात त्याचे गुगल अकाउंट असावे लागते . जीमेलचा वापर करणारे युजर्सची संख्या करोडोच्या घरात आहे. आता तर जीमेल डेस्कटॉप बरोबरच स्मार्टफोन, टॅब मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. विशेष, म्हणजे जीमेल सगळ्याच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे, जसे कि विंडोज, अँड्रॉइड, आयफोन आदी. ई-मेल पाठविण्यासाठी अनेक युजर्सची पहिली पसंती ही जीमेलच असते.
जीमेल अटॅचमेन्ट साईज ही सेंड आणि रिसिव्हसाठी २५ एमबी होती . मात्र जेव्हा तुम्हाला एखादा मोठी अटॅचमेन्ट साईज असलेली ई-मेल पाठवायची असेल तेव्हा गुगल ड्राईव्ह वर शेअर करणे हा एक पर्याय होता .मात्र आता गुगलने त्यांच्या जीमेल युजर्सला एक मोठी भेट दिली आहे. त्यांनी ई-मेल अटॅचमेन्ट साईज ही ई-मेल रिसिव्ह साठी आता ५० एमबी केली आहे . म्हणजेच तुम्ही इतर ई-मेल सर्व्हिस प्रोव्हाइडर कडून आता ५० एमबीपर्यंत ई-मेल अटॅचमेन्ट मागवू शकता . मात्र गुगल ने जीमेलची सेंड अटॅचमेन्ट साईज लिमिट ही २५ एमबीच ठेवली आहे. त्यामध्ये गुगल ने कुठलाच बदल केलेला नाही .