संवैधानिक तत्त्वांपासून फारकत घेणे महागात पडेल-राष्ट्रपती
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:51+5:302015-02-11T23:19:51+5:30
नवी दिल्ली : संवैधानिक तत्त्वे आणि तरतुदींपासून फारकत घेतली तर देशाची लोकशाही चौकट कमजोर होईल आणि नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हिताला सुरुंग लागेल, असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला आहे.

संवैधानिक तत्त्वांपासून फारकत घेणे महागात पडेल-राष्ट्रपती
न ी दिल्ली : संवैधानिक तत्त्वे आणि तरतुदींपासून फारकत घेतली तर देशाची लोकशाही चौकट कमजोर होईल आणि नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हिताला सुरुंग लागेल, असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला आहे.४६ व्या राज्यपाल संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुखर्जी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रपती आणि राज्यघटना हा शासनाला चौकट पुरविणारा एकमेव मार्गदर्शक दस्तऐवज आहे. राज्यपालांनी शांतता आणि सांप्रदायिक सलोखा राखला जाईल हे सुनिश्चित करायला पाहिजे.प्रत्येक भारतीय हा राज्यघटनेकडे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची हमी देणारा दस्तऐवज म्हणून पाहतो, असे नमूद करून मुखर्जी म्हणाले, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालविला जात आहे, हे राज्यपाल आणि नायब राज्यपालांनी सुनिश्चित करायला पाहिजे. शांतता आणि सांप्रदायिक सलोखा नांदत आहे, हे सुनिश्चित केले पाहिजे.या दोन दिवसीय संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. (वृत्तसंस्था)