भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला जर्मनीचा पाठिंबा
By Admin | Updated: October 5, 2016 22:54 IST2016-10-05T22:30:43+5:302016-10-05T22:54:05+5:30
भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला जर्मनीनं पाठिंबा दर्शवला आहे.

भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला जर्मनीचा पाठिंबा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला जर्मनीनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रत्येक देशाला जागतिक दहशतवादापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे, जर्मनीचे अँबेसेडर मार्टिन नी यांनी सांगितलं आहे.
या सीमेपलिकडचे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे प्रत्येक देशानं स्वतःच्या देशात दहशतवादाचा उद्रेक होणार नाही याची खात्री बाळगली पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे देशानं जागतिक दहशतवादापासून स्वतःच्या प्रदेशाचे संरक्षण केलं पाहिजे, असं मार्टिन नी म्हणाले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही भारतासोबत आहोत, असं नी म्हणाले आहेत.
याआधी भारताच्या सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर रशियानंही पाठिंबा दिला होता. तसेच इतर देशांनीही दहशतवादाविरोधात आक्रमकता दाखवत भारताला पाठिंबा दर्शवला आहे.